China Bunkers । कुरापतखोर चीनची आगळीक; पहा कुठे बांधलेत बंकर्स, भारताचा मोठा दावा

China Bunkers । चीन हा देश सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भारतावर कुरापती करत असतो. सध्याही चीनने पुन्हा मोठी कुरापत केली आहे. यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

चीनने आता पँगाँग सरोवराजवळ अनेक मोठी बंकर्स बांधल्याचे उपग्रहांकडून प्राप्त छायाचित्रांवरून स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे चिनी सैनिक सरोवराच्या आसपास खोदकाम करीत आहे, असे या छायाचित्रांत दिसून येत आहे. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तसेच इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी हे बंकर्स बांधले आहे, अशी माहिती आहे. इतकेच नाही तर लष्करी वाहने पार्क करून ठेवता यावी, यासाठी पक्के बांधकाम करण्यात येत आहे.

पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील पर्वतराजींमध्ये असलेल्या सिरजाप येथे पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिकी मुख्यालय आहे. पण हा तळ आमच्या भूभागावर आहे असा दावा भारत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हा तळ सुमारे पाच किमी दूर आहे. मे २०२० मध्ये ज्यावेळी या भूभागावरून विवाद सुरू झाला, त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात आले नव्हते.

अमेरिकन फर्म ‘ब्लॅकस्काय’ने जी उपग्रह छायाचित्रे जारी केली असून त्यानुसार २०२१-२२ मध्ये पाया बांधल्यानंतर आता भूमिगत बंकर्स बांधले दिसते. ३० मे रोजी घेतलेल्या छायाचित्रात बंकर्सचे प्रवेशद्वार स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. पाच प्रवेश द्वारवाला एक छोटा बंकर मोठ्या बंकरजवळ दिसतो.

या ठिकाणी आहेत बंकर्स

चीनचा हा तळ गलवानपासून १२० किमी दूर दक्षिण-पूर्वेला असून येथेच जून २०२० मध्ये उभय सैन्यामध्ये देखील मोठा संघर्ष झाला होता.

Leave a Comment