New Plan : सरकारी कर्मचारी असोत की खाजगी कंपनीत काम करणारे लोक, प्रत्येकजण सुट्टी कधी मिळेल याचा विचार करत असतो. कुठे आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते तर कुठे ही सुट्टी दोन दिवस असते. मात्र, जगभरातील अनेक देशांनी सुट्ट्यांमध्ये वाढ करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, चिलीच्या (Chile) राष्ट्रपतींनी एक नवीन योजना आणली असून त्यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त चाळीस तास कामकाज (Work) करावे लागणार आहे. सध्या हा नियम 45 तासांच्या कामकाजाचा आहे.
चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांच्या सरकारने मंगळवारी सांगितले, की त्यांनी देशातील कामकाजाचे तास कमी करणारे विधेयक मंजूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. कामाचे तास 45 ऐवजी 40 पर्यंत कमी करावेत, हा या योजनेचा उद्देश आहे. हे काम खूप आधी व्हायला हवे होते, पण आधीच्या सरकारमुळे उशीर झाला, असेही ते म्हणाले.
विद्यमान अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांच्या सरकारच्या प्रवक्त्या कॅमिला व्हॅलेजो यांनीही हा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला (Proposal) राष्ट्रपतींनी हिरवा कंदील दिला आहे. चिलीच्या घटनेत अशी तरतूद आहे जी सर्व खासदारांना विधेयकाचा विचार करण्यास भाग पाडते जर ते राष्ट्रपतींनी अनिवार्य केले असेल. अशा परिस्थितीत लवकरच ते कायद्याच्या रूपाने बाहेर येण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, सार्वजनिक वाहतूक चालक आणि घरगुती कामगार यांसारख्या विशेष श्रेणीतील कामगारांसाठी कामाचे तास कमी करण्याच्या सुधारणांसह सरकारने इतर अनेक प्रस्ताव देखील सादर केले आहेत. बोरिक यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, नव्या चिलीसाठी या सुधारणा आवश्यक आहेत. बोरिक म्हणाले की, त्यांच्या सरकारने या विधेयकावर लवकरात लवकर मतदान केले जाईल आणि दोन्ही विधानसभेने मंजूर केले जाईल अशी अपेक्षा केली.