नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी मोठी घोषणा केली आहे. पंजाब ते दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत बस सुविधा सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पंजाब सरकारच्या या बसचे भाडे खासगी बसच्या तुलनेत निम्म्याहून कमी असेल.
सरकारी बसेस दिल्ली विमानतळापर्यंत धावतील
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाब ते दिल्ली विमानतळापर्यंत सरकारी बस चालवण्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने (AAP) वाहतूक माफिया संपवण्याचे आश्वासन दिले होते. सरकारच्या या निर्णयामुळे खासगी बस माफियांवर आळा बसेल, असे मुख्यमंत्री भागवत मान यांनी सांगितले.
खासगी बसचालकांच्या मनमानी कारभाराला ब्रेक लावला जाईल
15 जूनपासून या सरकारी बसेसचे कामकाज सुरू होणार आहे. 15 जून रोजी मुख्यमंत्री भगवंत मान दिल्ली विमानतळावर बस सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. या बसेस चालवल्यास खासगी बसचालकांच्या मनमानी कारभाराला ब्रेक लागणार आहे. या सरकारी बसेसमध्ये लोकांची गरज लक्षात घेऊन अत्यंत कमी भाडे ठेवण्यात येणार आहे. खासगी बसच्या तुलनेत या सरकारी बसचे भाडे निम्म्याहून कमी असेल, असे सांगण्यात येत आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
या मोठ्या घोषणा आतापर्यंत झाल्या आहेत
पंजाबच्या मान सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये 1 जुलैपासून पंजाबमध्ये दरमहा 300 युनिट मोफत वीज, 25 हजार सरकारी नोकऱ्या अशा मोठ्या घोषणांचा समावेश आहे. यासोबतच सरकारने काही सरकारी पदांसाठी नुकत्याच जाहिराती दिल्या होत्या. 15 ऑगस्टपासून पंजाबमध्ये 75 मोहल्ला क्लिनिक सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.