Chhagan Bhujbal । काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला

Chhagan Bhujbal । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यापासून राज्याचे राजकीय वातावरण पेटल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असतात.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. ते आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काल आरोप करणारे भुजबळ आज थेट शरद पवार यांची भेट घेणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

शरद पवार यांची तब्येत ठिक नसल्याने ते कोणाची भेट घेत नाहीयेत. पण शरद पवारांनी चक्क छगन भुजबळ यांना भेटीची वेळ दिली आहे. भुजबळ हे सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. त्यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे भुजबळ म्हणाले होते.

छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण काय? असे विचारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.

Leave a Comment