Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये मोठ्ठा ट्विस्ट! भुजबळांच्या एन्ट्रीने तिढा वाढला; पहा, राष्ट्रवादीचं प्लॅनिंग काय?

Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर आमचीच दावेदारी सर्वात बळकट असल्याचे शिंदे गटाचे नेते सांगत होते. परंतु, हाच मतदारसंघ राज्यात सर्वाधिक तिढ्याचा ठरू लागला आहे. या मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस वाढली आहे. मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाईल हेच निश्चित नसताना मंत्री छगन भुजबळ यांच्या (Chhagan Bhujbal) वक्तव्याने मोठा ट्वि्स्ट आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा अधिकच वाढला आहे. या मतदारसंघासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव दिल्लीत अचानक आला. याबाबत मला माहिती नव्हतं. पण आता महायुतीत नाशिकची जागा जर महायुतीला सुटली तर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढू, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांचे शिलेदार ठरले; तुतारी हाती घेताच लंकेंना तिकीटही मिळालं

Chhagan Bhujbal

मंत्री भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं. नाशिक लोकसभेबाबत माझा आग्रह नव्हता. राजधानी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात माझ्या नावाचा प्रस्ताव अचानक पुढे आला. नाशिकला भुजबळांनी उभं राहावं असं ठरलं. आम्हाला याबाबत माहिती नव्हती. त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनीही हे खरं असल्याचं सांगितलं.

यानंतर मी काही लोकांशी चर्चा केली. विचार करण्यासाठी वेळ द्या असंही कळवलं. परंतु, आता नाशिकचे जे खासदार आहेत त्यांच्याकडून जास्त आग्रह धरला जात आहे. त्यामुळे फक्त चर्चा सुरू आहेत. यानंतर जो काही निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य राहिल असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.नाशिकचे खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी जास्त आग्रही आहेत. परंतु, जर महायुतीच्या जागावाटपात नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर येथे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू असे छगन भुजबळ म्हणाले.

Loksabha Election 2024 : महायुतीसाठी अमित शहा तयार करणार मास्टर प्लॅन, जागावाटपाचा फॉर्म्युला होणार फिक्स?

Leave a Comment