Chhagan Bhujbal | शिंदेसेनेला गुडन्यूज! नाशिकमधून राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची माघार

Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाटेला (Chhagan Bhujbal) गेल्यानंतर शिंदे गटासाठी नाशिकमधून गुडन्यूज मिळाली आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला होता. परंतु आज हा मतदारसंघ शिंदे गटाला देण्यात आला. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत स्वतःहून माघार घेत असल्याचे आज जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली तसेच एका मतदारसंघामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ नये आणि प्रचारात विरोधकांना आघाडी मिळू नये यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक लोकसभेसाठी नाव सुचविले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भुजबळ यांनी आभार देखील मानले. भुजबळ यांच्या या निर्णयाने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या मतदारसंघात हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला होता. परंतु या मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केला होता. त्यामुळे मोठा तिढा निर्माण झाला होता.

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये मोठ्ठा ट्विस्ट! भुजबळांच्या एन्ट्रीने तिढा वाढला; पहा, राष्ट्रवादीचं प्लॅनिंग काय?

Chhagan Bhujbal

पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी मागील काही दिवसात ज्या घटना घडल्या त्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, अनेक ठिकाणचा जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत खल सुरू होता. यामध्ये मला वाटतं एका जागेसाठी महायुतीत तणाव निर्माण होऊ नये तसेच विरोधकांना प्रचाराच्या पातळीवर आघाडी मिळू नये यासाठी मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

भुजबळ पुढे म्हणाले त्या दिवशी होळी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं. यावेळी तेथे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक झाली. त्यामध्ये नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला असून येथे आपण उमेदवार असावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे मला सांगण्यात आले. आता आपण तयारीला लागा असे आदेश अजित पवार यांनी दिले. पण माझ्यापेक्षा समीर भुजबळ अधिक योग्य उमेदवार राहतील असा प्रस्ताव मी त्यावेळी मांडला होता. परंतु समीर भुजबळ यांचा आग्रह अमित शहा यांनी नाकारला असून आपणच त्या ठिकाणावरून उमेदवारी करावी असा निरोप अमित शहांनी दिल्याचे अजित पवार यांनी मला सांगितले.

Chhagan Bhujbal

Sangli Lok Sabha | काँग्रेसचा माइंडगेम! सांगलीसाठी ठाकरेंना नवा प्रस्ताव; पॉलिटिकल खेळीत कुणाचा पत्ता कट?

नाशिक लोकसभेसाठी माझे नाव सुचविले गेले यावर माझा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी (Devendra Fadnavis) चर्चा केली. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की अमित शहांनीच आपले नाव पुढे केले आहे. नाशिक मतदारसंघातून आपणच लढावं असा त्यांचा आदेश आहे, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनीही आपलं नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवल्याचे सांगितले अमित शहा यांनी देखील आपल्याच नावाचा आग्रह धरला होता अशी माहिती बावनकुळे यांनी दिल्याचे भुजबळ म्हणाले.

परंतु या मतदारसंघात महाविकास आघाडीने उमेदवार देऊन त्यांचा प्रचारही सुरू झाला होता. हे पाहता महायुतीने नाशिकबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु तसे काही घडत नव्हते. यावर मला काही भाष्य करायचं नाही. परंतु नाशिकच्या जागेबाबतची गोंधळाची परिस्थिती कायम राहावी असे मला वाटत नव्हते. त्यामुळे आज मी नाशिकमधून उमेदवारी माघार घेत आहे असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment