Cheque Bounce : चेक बाऊन्स झाला? भरावा लागेल दंड आणि तुरुंगवासही लागेल भोगावा

Cheque Bounce : प्रत्येकाचे बँकेत खाते असते. प्रत्येक बँका वेगवेगळे व्याजदर आकारात असतात. जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत ग्राहक खाते चालू करतात. अनेकजण चेकचा वापर करतात. पण चेक बाऊन्स झाला तर तुम्हाला दंड आणि तुरुंगवासही भोगावा लागेल.

हे लक्षात घ्या की चेक बाऊन्स झाला तर बँक दंड आकारत असते. चेक बाऊन्स होण्याचा दंड विविध बँकांमध्ये वेगवेगळा असतो. काही परिस्थितींमध्ये, चेक बाऊन्स झालं तर तुमच्यावर कारवाई होते आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागते.

चेक बाऊन्सची कारणे

  • खाते क्रमांकात चुकणे
  • स्वाक्षरी जुळत नसणे
  • खात्यात शिल्लक नाही किंवा कमी आहे
  • चेक जारीकर्त्याचे खाते बंद करणे
  • बनावट चेकचा संशय
  • कालबाह्यता पाहणे
  • चेकवर कंपनीचा शिक्का नसणे

किती दंड भरावा लागतो?

दंड ज्या व्यक्तीने चेक जारी केला आहे त्याला भरावा लागतो.
हा दंड कारणांनुसार बदलतो. 150 ते 750 किंवा 800 रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो.

दरम्यान, भारतात चेक बाऊन्स हा गुन्हा मानला जातो. चेक बाऊन्स्ड नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट, 1881 नुसार चेक बाऊन्स झाला तर समजा एखाद्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. त्याला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा चेकच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. हे तेव्हाच घडते जेव्हा चेक देणाऱ्याच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसते. तसेच बँक चेकचा अनादर करते.

केस केव्हा होते?

धनादेश अनादर होताच, पैसे देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. चेक बाऊन्स झाला तर सर्वात अगोदर बँक धनकोला एक पावती देते, ज्यात चेक बाऊन्स होण्याचे कारण स्पष्ट केले जाते. यानंतर कर्जदाराला ३० दिवसांच्या आत कर्जदाराला नोटीस पाठवणे गरजेचे असते. नोटीस दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत कर्जदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर, नोटीस दिल्यानंतर 15 दिवस संपल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत कर्जदार दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करतो.

त्यानंतर रक्कम भरली नाही तर कर्जदारावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 138 नुसार चेक बाऊन्स होणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.

Leave a Comment