Cheque Bounce Rule : चेक बाऊन्स झाला? तुमच्यावरही होईल कारवाई, काय सांगतो नियम? जाणून घ्या

Cheque Bounce Rule : भारतात चेक बाऊन्स होणे हा एकप्रकारचा गुन्हा मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही कोणाला चेक देत असाल तर तो काळजीपूर्वक तपासून घ्या. नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अनेकदा चेक बाऊन्स झाल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होते.

एका महिन्याच्या आत पेमेंट

कोणत्याही परिस्थितीत चेक बाऊन्स झाला तर हे लक्षात ठेवा की बँक तुमच्या खात्यातून दंड कापते. चेक बाऊन्स झाला तर कर्जदाराला त्याची माहिती बँकेला द्यावी लागते, त्यानंतर त्या व्यक्तीला एका महिन्याच्या आत पैसे भरणे गरजेचे असते.

काय सांगतो नियम? जाणून घ्या

आपण चेकच्या नियमांबद्दल बोलायचे झाले तर, धनादेश बाऊन्स झाल्यानंतर एक महिन्याच्या आत कर्जदार पैसे भरू शकला नाही, तर त्याच्या नावावर कायदेशीर नोटीस जारी केली जाते. या नोटिशीला १५ दिवसांत उत्तर मिळाले नाही तरीबी अशा व्यक्तीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 च्या कलम 138 अन्वये गुन्हा दाखल केला जातो.

तुरुंगवास होऊ शकतो?

अनेकांना हे जाणून घ्यायचे आहे की चेक बाऊन्स झाल्यास तुरुंगवास होतो का?. समजा एखाद्या कर्जदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तुम्हाला मूळ रकमेवर (देय रक्कम) व्याज द्यावे लागणार आहे हे लक्षात घ्या.

हे ठेवा लक्षात

तर त्याच वेळी, ज्यावेळी तुम्ही एखाद्याला चेक देता तेव्हा तुमच्या खात्यात पैसे असल्याची खात्री करा आणि तुमचा चेक बाऊन्स होणार नाही, देखील काळजी घ्या. याशिवाय चेक घेणाऱ्या व्यक्तीने तो तीन महिन्यांच्या आत कॅश करावा, कारण त्याची वैधता केवळ तीन महिन्यांची असते हे देखील चुकूनही विसरू नका.

Leave a Comment