Cheapest Home Loan : आता घर घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, ‘ही’ बँक देतेय सर्वात स्वस्त गृहकर्ज; जाणून घ्या

Cheapest Home Loan : प्रत्येकाला आपल्या स्वप्नातले घर बांधण्याची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत करत असतो. पण अनेकवेळा पैशांची कमतरता भासत असते. त्यामुळे ते गृहकर्ज घेतात. सर्वात स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकांकडे अनेकांचा कल असतो.

यामध्ये ओळखीचा पुरावा, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, मतदार ओळखपत्र, वयाचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश असून पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे असणार आहे. यासोबतच तुम्हाला बँकिंग माहिती, नातेसंबंधाचा पुरावा आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे विचारण्यात येतात. कोणती बँक सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे, जाणून घेऊयात.

या ठिकाणी मिळतेय स्वस्त गृहकर्ज

सध्या बँक ऑफ इंडिया सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज देत असून बँक ऑफ इंडिया दरवर्षी ८.३०% पासून सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि युनियन बँक ऑफ इंडिया दरवर्षी ८.३५% या सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे हे लक्षात घ्या. गृहकर्जाचे अंतिम व्याजदर अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, व्यवसाय, नियोक्त्याचे प्रोफाइल यासारख्या घटकांवर अवलंबून असते.

बँकेत जाऊन घ्या माहिती

हे लक्षात घ्या की गृहकर्ज घेणाऱ्यांना बँक ऑफ इंडिया, एलआयसी हाउसिंग फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज मिळत आहे. पण तुम्हाला गृहकर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी तुम्ही संबंधित बँकेकडून व्याजदर एकदा तपासून घ्या.

Leave a Comment