Cheapest Cars With Adas : खरेदीदारांनो! ADAS तंत्रज्ञान असणाऱ्या ‘या’ आहेत सर्वात स्वस्त कार, लगेचच आणा घरी

Cheapest Cars With Adas : कमी पैशात जास्त फीचर्स देणाऱ्या कार्स खरेदी करण्याकडे सध्या खरेदीदारांचा कल आहे. कंपन्या देखील आपल्या नवीन खरेदीदारांना कमी खर्चात उत्तम फीचर्स देण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही ADAS तंत्रज्ञान असणाऱ्या सर्वात स्वस्त कार खरेदी करू शकता.

Hyundai Venue

ADAS सारख्या उत्कृष्ट सेफ्टी फीचर्ससह Hyundai द्वारे Venue ऑफर केले जाते. या वाहनात कंपनीने लेव्हल-1 ADAS देण्यात आले आहे. हे फिचर फक्त SUV च्या SX (O) प्रकारात दिले जात आहे. किमतीचा विचार केला तर याची किंमत 12.44 लाख रुपये आहे.

होंडा एलिव्हेट

होंडाची आपली मध्यम आकाराची SUV एलिव्हेट ADAS सह ऑफर करते. कंपनीने या फीचरला Honda Sensing म्हटले आहे. हे केवळ Elevate च्या ZX प्रकारात ऑफर केले जात आहे. किमतीचा विचार केला तर Honda Elevate च्या ZX प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 15.41 लाख रुपये इतकी आहे.

होंडा सिटी

होंडाच्या एलिव्हेट शिवाय हे सेफ्टी फीचर्स मध्यम आकाराच्या सेडान कार सिटीमध्ये प्रदान करण्यात आले आहे. ADAS सारख्या सेफ्टी फीचर्स सोबत इतर अनेक फीचर्स कंपनीने दिले आहेत. ADAS या कारच्या तीन प्रकारांमध्ये प्रदान दिली आहे, ज्यात V, VX आणि ZX यांचा समावेश आहे. तुम्हाला ADAS सह Honda City 12.85 लाख रुपये किमतीत खरेदी करता येईल.

महिंद्रा XUV 3XO

महिंद्राने नुकतीच कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीच्या या SUV मध्ये ADAS देखील दिले आहे. कंपनी SUV मध्ये Level-2 ADAS पुरवत आहे. हे फीचर त्याच्या AX5 L आणि AX7 L मध्ये दिले जात आहे. किमतीचा विचार केला तर एक्स-शोरूम किंमत 13.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

किआ सोनेट

कंपनीने भारतात कॉम्पॅक्ट SUV म्हणून ऑफर केली आहे. कंपनीच्या या एसयूव्हीमध्ये लेव्हल-1 ADAS दिली आहे. हे फिचर त्याच्या GTX+ आणि X-Line प्रकारांमध्ये प्रदान केले आहे. लेव्हल-1 एडीएएस सोबत, यात सुरक्षिततेसाठी 10 स्वायत्त फीचर्स आहेत. या फीचरसह एसयूव्ही 14.55 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करता येईल.

Leave a Comment