Cheapest Bikes : ‘या’ आहेत देशातील सर्वाधिक परवडणाऱ्या बाइक्स, जबरदस्त मायलेजसह मिळतील शानदार फीचर्स

Cheapest Bikes : भारतीय बाजारात अनेक बाइक्स उपलब्ध आहेत. ज्यात जबरदस्त फीचर्स तसेच उत्तम मायलेज मिळते. पण काही बाइक्सच्या किमती खुप जास्त आहेत. असे असले तरी तुम्ही काही बाइक्स खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

TVS स्पोर्ट बाइक

TVS स्पोर्ट ही एक उत्तम एंट्री लेव्हल बाइक असून जी तरुणांना तसेच कौटुंबिक वर्गाला लक्ष्य करते. या बाईकची रचना आणि तिचे दमदार इंजिन या बाईकला तिच्या सेगमेंटमध्ये खास बनवते. किमतीचा विचार केला तर या बाईकची किंमत 59,431 रुपयांपासून सुरू होते. तर या बाइकमध्ये 110cc इंजिन आहे जे 8.29PS पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते. हे 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज असून या शानदार बाईकचा परफॉर्मन्स स्मूथ आहे.

माहितीनुसार, ही बाईक एका लिटरमध्ये 70km मायलेज देते. बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. बाईकमध्ये 10 लिटरची इंधन टाकी असून खराब रस्त्यांसाठी, समोर आणि मागील बाजूस मजबूत आणि चांगले सस्पेंशन देण्यात आले आहे. प्रभावी ब्रेकिंगसाठी, बाईकचे पुढील आणि मागील टायर ड्रमने सुसज्ज आहेत. हे इलेक्ट्रिक स्टार्टसह येते. बाईकचे वजन 112 किलो इतके आहे.

बजाज प्लॅटिना 100

बजाज ऑटोची प्लॅटिना 100 ही एंट्री लेव्हल बाइक सेगमेंटमधील ग्राहकांची अनेक काळापासून आवडती बाइक असून बाईकचे डिझाईन चांगले आहे आणि त्यावर दिलेल्या फुल बॉडी ग्राफिक्सच्या मदतीने थोडा स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. या बाइकला LED DRL सह हेडलॅम्प्स मिळतात जे रात्रीच्या वेळी चांगले असतात.

कंपनीच्या या बाईकमध्ये 102cc इंजिन आहे जे 7.9PS पॉवर आणि 8.3Nm टॉर्क निर्माण करते. या जबरदस्त बाइकला 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाईकमध्ये १७ इंच टायर असून दोन्ही टायरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. Platina मध्ये 11 लिटरची इंधन टाकी आहे. बाईकचे वजन 117 किलो इतके आहे.

Leave a Comment