Chandrayaan3 : भारताची सर्वात महत्त्वाची अंतराळ मोहीम चांद्रयान (Chandrayaan3) हळूहळू त्याच्या ध्येयाच्या जवळ येत आहे. यानाने चंद्राचे काही छायाचित्रे पाठवली आहेत. इस्रोने (ISRO) जारी केलेला हा व्हिडिओ लँडर इमेजर कॅमेरा-1 मधून टिपण्यात आला आहे. त्याच वेळी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान-3 च्या लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) ने घेतलेले चंद्राचे आणखी एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे, जे वाहनाने 15 ऑगस्ट रोजी टिपले होते.
इस्रोने नवीन अपडेट जारी केले
17 ऑगस्ट म्हणजेच गुरुवारी यानाने प्रोपल्शन मॉड्यूलला लँडर आणि रोव्हरपासून वेगळे केले. यानंतर आता चंद्रयानाचा रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी वेगाने मार्गक्रमण करत आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारचा दिवसही यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. लँडर आणि रोव्हरपासून प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे केल्यानंतर, ISRO ने एक नवीन अपडेट जारी केले ज्यामध्ये लँडर मॉड्यूल सामान्यपणे काम करत आहे.
भारताच्या मोहिमेचा उद्देश काय?
भारताच्या चांद्रयान3 चा उद्देश चंद्रावर भूकंप कसे येतात याचा अभ्यास करणे हा आहे. चंद्रावरील मातीचाही अभ्यास चांद्रयान करणार आहे. ज्या भागात चांद्रयान उतरणार आहे तेथे पाणी आणि खनिज पदार्थ असण्याचीही शक्यता आहे. भविष्यात मानवाला चंद्रावर राहणे शक्य आहे का याचाही अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे.
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी सज्ज
5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. 14 ऑगस्ट रोजी रॉकेट चंद्राच्या चौथ्या कक्षेत बदलले जाईल. यानंतर 16 ऑगस्टला पाचवी कक्षा बदलण्यात येणार आहे. जर सर्वकाही योजनेनुसार झाले तर, 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.