Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan 3) बुधवारी संध्याकाळी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. भारताच्या या चंद्र मोहिमेकडे (Moon Mission) केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण, याआधी रशियाचे लुना-25 (Luna 25) चंद्रावर उतरण्यापूर्वी क्रॅश झाले होते.
भारताचे चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यासाठी आता जागेची निश्चिती केली आहे. चंद्रावरील या ठिकाणाचे काही फोटो इस्त्रोने (ISRO) शेअर केले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील लँडिंग साइटची छायाचित्रे शेअर करत इस्रोने लिहिले, “लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अव्हॉइडन्स कॅमेरा (LHDAC) ने टिपलेली चंद्राच्या दूरच्या बाजूची छायाचित्रे येथे आहेत.”
इस्रोने वेळेत केला बदल
रविवारी रशियाचे लूना-25 यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधीच क्रॅश झाले. Luna-25 आज किंवा उद्या (सोमवार-मंगळवार) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते, पण त्याआधीच ते क्रॅश झाले. Luna-25 क्रॅश झाल्याची बातमी येताच इस्रोने आपल्या चंद्रयान चंद्रावर उतरण्याच्या वेळेत बदल केला.
आता चांद्रयान-3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6.4 वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तुम्हीही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊ शकता. वास्तविक, इस्रो चांद्रयान-३ चे लँडिंग लाईव्ह दाखवणार आहे. यासाठी संस्थेने तयारी देखील केली आहे.
..म्हणून भारताने टाळला शॉर्टकट
भारताने आपली चंद्र मोहीम मर्यादित संसाधनांसह सुरू केली आहे. चांद्रयान-३ पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवण्यात आले होते. पृथ्वीभोवती फिरल्यानंतर चांद्रयान-3 आता चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. या प्रक्रियेतून रॉकेटचे इंधन कमी खर्च होत आहे. त्याचबरोबर चांद्रयान-3 ला पृथ्वी आपल्या अक्षावर ज्या गतीने फिरते त्याचा फायदा झाला आहे. “चांद्रयान-3 चे रॉकेट लहान आहे, त्यामुळे आपल्या देशाचे रॉकेट इतका वेग निर्माण करू शकत नाही.” रशियाचे हे मिशन भारताच्या मिशनपेक्षा जास्त महाग आहे.