Chandrayaan 3 : चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ (Chandrayaan 3) च्या सॉफ्ट लँडिंगमुळे जगाने भारताच्या पराक्रमाची दखल घेतली. अशा स्थितीत भारत सरकारने चांद्रयान मिशनच्या (Moon Mission) यशाचा आनंद साजरा करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस (National Sapce Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चांद्रयान-३ चे लँडिंग
चांद्रयान-3 चे 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाले होते. दक्षिण ध्रुवावर (Moon South Poll) अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव देश आहे. हे मिशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या वैज्ञानिकांचे कठोर परिश्रम आणि धैर्य दर्शवते.
अधिसूचना जारी
23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरचे लँडिंग आणि प्रज्ञान रोव्हर तैनात करून मिशनच्या यशाची आठवण म्हणून सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सरकारने शनिवारी अधिसूचना जारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले होते की 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करेल. हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.
चांद्रयान-3 चे लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ (Shivshakti Point) असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचे संकल्प आहेत आणि ते संकल्प पूर्ण करण्याची शक्ती शिवाकडूनच मिळते.