Chandrayaan 3 : इस्त्रोच्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर अनेक पदार्थांचे पुरावे मिळाले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे स्पष्ट पुरावे सापडल्याचे इस्रोने (ISRO) म्हटले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक पदार्थांचे पुरावे सापडले असल्याची माहिती इस्रोने दिली. ते म्हणाले की, चंद्रावर अॅल्युमिनियम, लोह सल्फरसह अनेक पदार्थांची माहिती मिळाली आहे.
इस्रोच्या(ISRo) चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ‘प्रज्ञान’ रोव्हरला चंद्रावर अनेक पदार्थांचे पुरावे मिळाले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे स्पष्ट पुरावे सापडल्याचे इस्रोने म्हटले आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक पदार्थांचे पुरावे सापडले असल्याची माहिती इस्रोने (ISRO) दिली. ते म्हणाले की, चंद्रावर अॅल्युमिनियम, लोह, सल्फरसह अनेक पदार्थांची माहिती मिळाली आहे. हायड्रोजन (एच) चा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या दृष्टीने हे आणखी एक मोठे यश म्हणता येईल.
याबाबत इस्त्रोने सांगितले, की चंद्रावर वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. रोव्हरवरील लेझर-आधारित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) उपकरणाने प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सल्फरचा पुरावा शोधला आहे. पूर्वी अपेक्षेप्रमाणे, अॅल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचे पुरावे चंद्रावर सापडले आहेत.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तापमान किती ?
याआधी विक्रम लँडरने मोठा शोध लावला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील जमिनीचे तापमान किती आहे याचे उत्तर तपासणी करून दिले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासन एक सेंटीमीटरवर तापमान 50 अंश सेल्सियस आहे असे सांगितले होते. जगाच्या दृष्टीने विक्रम लँडरने दिलेली ही माहिती देखील खूप उपयुक्त अशीच आहे.