Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan 3) अवघ्या काही क्षणात चंद्रावर (Moon Mission) उतरणार (Chandrayaan 3 Landing) आहे. संपूर्ण देशवासीय या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी अनेक ठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत.
दुसरीकडे, एका हँडलद्वारे केलेल्या ट्विटमध्ये, भारताच्या चांद्रयान-3 चंद्र मोहिमेचा खर्च इंटरस्टेलर या हॉलिवूड चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षा खूप कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यावर टेस्ला कंपनीचे प्रमुख एलोन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या उत्तरात लिहिले, हे भारतासाठी चांगले आहे.
ट्वि्टरवरील पोस्टमध्ये असे म्हटले आहे की भारताच्या चंद्र मोहिमेचे बजेट $75 दशलक्ष (जवळपास 490 कोटी रुपये) आहे, तर इंटरस्टेलरचे निर्माते – मॅथ्यू मॅककोनाघी यांनी प्रकल्पावर $165 (जवळपास 1200 कोटी भारतीय रुपये)दशलक्ष खर्च केले आहेत.
इंटरस्टेलर Vs चांद्रयान-3 बजेट
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान-3 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावरील अंतराळ यानावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे आहे. इस्रोच्या चांद्रयान-३ चंद्र मोहिमेच्या यशासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान, ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये “चंद्र वाहन” आहे, सुमारे $75 दशलक्षच्या एकूण बजेटमध्ये तयार केले गेले आहे.
क्रिस्टोफर नोलनच्या महाकाव्य ‘इंटरस्टेलर’ स्पेस अॅडव्हेंचरवर आधारीत एक चित्रपट आहे. ज्यामध्ये मॅथ्यू मॅककोनाघी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट $165 दशलक्षच्या एकूण बजेटमध्ये बनवण्यात आला होता.