Chana Masala Recipe : रोजच्या जेवणात काय भाजी करायची (Chana Masala Recipe) असा प्रश्न महिलांना नेहमीच असतो. भाजी अशी की टेस्टी तर असेलत शिवाय पौष्टिकही. यासाठी मग पौष्टिक भाज्यांचा शोध सुरू होतो. त्यात मसालेदार पदार्थ अनेकांनाच पसंत असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात काही मसालेदार पदार्थ खायचे असतील तर तुम्ही चना मसाला तायार करून पाहू शकता. चला तर मग चटपटीत चना मसाला कसा तयार करायची त्याची रेसिपी माहिती करून घेऊ या..
साहित्य
हरभरे, कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो, मीठ, तेल
रेसिपी
सर्वात आधी भिजलेले हरभरे प्रेशर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत उकळून घ्या. नंतर त्यात कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून टाका. आता पॅन गरम करा. त्यात तेल घाला. नंतर त्यात कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण घालून 3 ते 4 मिनिटे परतून घ्या. आता त्यात मसाले आणि मीठ मिसळा. हे मिश्रण तेल सुटेपर्यंत तळून घ्या. त्यात उकडलेले हरभरे घाला, नीट ढवळून घ्या. साधारण 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करा. टेस्टी चना मसाला तयार आहे.