मुंबई- भारतीय संघाने (Team India) महिला आशिया कप हॉकी (Women’s Asia Cup Hockey) स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. पूल अ च्या सामन्यात गुरजित कौरच्या (Gurjit Kaur) हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने सिंगापूरचा (Singapore) एकतर्फी सामन्यात 9-1 असा पराभव केला.(Chak De India! Team India reached the semi-finals on the strength of a hat-trick of this player)
अ गटातील तीन सामन्यांमधला भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे. संघाने त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात मलेशियाचा 9-0 ने पराभव केला होता. तर मागच्या सामन्यात त्यांना जपानकडून (Japan) 0-2 ने पराभव पत्करावा लागला होता.
मागच्या सामन्याचे अपयश मागे टाकत भारताने सिंगापूरविरुद्ध जबरदस्त खेळ दाखवला आहे. गुरजीत ने (8वे, 37वे, 48वे मिनिट) तीन गोलकेले तर मोनिका (6वे, 17वे मिनिट) आणि ज्योती (43वे, 58वे) यांनी प्रत्येकी दोन मैदानी गोल केले. वंदना कटारिया (8वे मिनिट) आणि मारियाना कुजूर (10वे मिनिट) यांनी गोल केले.
बुधवारी पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा ब गटातील अव्वल संघ कोरियाशी सामना होईल. पूल अ च्या दुसर्या सामन्यात जपानने मलेशियाचा 8-0 असा पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी होणार आहे. स्पेन आणि नेदरलँड्स यांच्या सह-यजमान असलेल्या स्पर्धेतील अव्वल चार संघ या वर्षीच्या FIH विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरले आहे.(Chak De India! Team India reached the semi-finals on the strength of a hat-trick of this player)