CDAC Vacancy 2024 । गलेगठ्ठ पगारासह ‘या’ ठिकाणी नोकरीची उत्तम संधी, उद्यापर्यंत करता येणार अर्ज

CDAC Vacancy 2024 । जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी तुम्ही तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले असावे. तरच तुम्हाला या पदांसाठी अर्ज करता येईल. हे लक्षात घ्या की तुम्हाला फक्त उद्यापर्यंत अर्ज करता येईल.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC) कडून प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प सहाय्य कर्मचारी आणि इतर अनेक पदांसाठी अर्ज मागवून घेतले आहेत. समजा तुम्ही या पदांसाठी पात्र असाल आणि अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइट cdac.in वर जाऊन अर्ज करू शकता.

उद्यापर्यंत करता येईल अर्ज

उमेदवारांनी वरील पदांसाठी 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करावेत. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होईल.

जागा तपशील

 • या भरती प्रक्रियेद्वारे CDAC मध्ये एकूण 325 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
 • प्रकल्प अभियंता (अनुभवी) – 75 पदे
 • प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम (PS&O) व्यवस्थापक – 15 पदे
 • प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर – ४५ पदे
 • वरिष्ठ प्रकल्प अभियंता (PS&O) अधिकारी – 75 पदे

प्रकल्प अधिकारी

 • वित्त – १ पद
 • ISEA – ३ पदे
 • आउटरीच आणि प्लेसमेंट – 1 पोस्ट

प्रकल्प समर्थन कर्मचारी

 • प्रोजेक्ट टेक्निशियन – 1 जागा
 • एचआरडी – 1 पोस्ट
 • प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – १ पद
 • लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी – 1 पोस्ट
 • प्रशासन – २ पदे
 • वित्त – ४ पदे
 • वरिष्ठ प्रकल्प अभियंता सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी – 100 पदे

पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असावी.

वयोमर्यादा

 • प्रकल्प अभियंता/फील्ड ऍप्लिकेशन अभियंता (अनुभवी), प्रकल्प अभियंता/फील्ड ऍप्लिकेशन अभियंता (फ्रेशर), प्रोजेक्ट
 • सपोर्ट स्टाफ (आतिथ्य), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे
 • वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/उत्पादन सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी – कमाल वयोमर्यादा 40 वर्ष
 • प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर – कमाल वयोमर्यादा ३० वर्षे
 • प्रकल्प व्यवस्थापक/व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/उत्पादन सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी –
 • कमाल वयोमर्यादा 50 वर्षे
 •  प्रकल्प तंत्रज्ञ – कमाल वयोमर्यादा ३० वर्षे

Leave a Comment