CBI Arrested K. Kavitha | ‘ईडी’नंतर ‘CBI’ कडून कविता गजाआड; पहा, नेमका घोटाळा काय?

CBI Arrested K. Kavitha : दिल्ली अबकारी घोटाळ्यात सीबीआयने (Delhi Excise Policy Case) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर (CBI Arrested K. Kavitha) यांची मुलगी के. कविताला अटक केली आहे. कविता सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. कविता यांची नुकतीच सीबीआयचे चौकशी केली होती. दिल्ली अबकरी घोटाळ्यात ईडीने या आधीच कविता यांना अटक केली होती. मार्च महिन्यात ईडीने केलेल्या अटकेनंतर आता सीबीआयने त्यांना अटक केल्याचे वृत्त आले आहे. सीबीआयने कविता यांना कोणत्या कारणामुळे अटक केली असा प्रश्न आता अनेकांच्या मनात उपस्थित होतो आहे.

या प्रकरणाच्या तपासात कवितांची एन्ट्री 1 डिसेंबर 2022 रोजी झाली होती. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याबाबत सीबीआयच्या पथकाने कविता यांची चौकशी केली होती. या पथकाने कविता यांची जवळपास 7 तास चौकशी केली होती. यानंतर कविता यांच्या अटकेचे वृत्त धडकले आहे. तसं पाहिलं तर कविता सध्या तुरुंगातच आहेत. त्यांना आता सीबीआयने देखील अटक केली आहे.

Arvind Kejriwal : केजरीवालांना आणखी एक दणका! पहा, काय घडलंंय दिल्लीच्या राजकारणात?

CBI Arrested K. Kavitha

भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता या दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपी आहेत. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या आधी ईडीने कविता यांना अटक केली होती. ईडीच्या पथकाने कविता यांना दोन समन्स बजावले होते. परंतु कविता यांनी या दोन्ही समन्सकडे दुर्लक्ष केले. उलट या समन्सबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी 19 मार्च पर्यंत पुढे ढकलली होती याच दरम्यान 15 मार्च रोजी ईडीने कविता यांना अटक केली होती.

ईडीने केलेल्या दाव्यानुसार या घोटाळ्यात साउथ लॉबीचाही सहभाग होता. या लॉबीत के. कविता यांची महत्त्वाची भूमिका होती. ईडीच्या म्हणण्यानुसार हैदराबादचे व्यापारी, वायएसआर काँग्रेसचे खासदार देखील यामध्ये सहभागी होते. आम आदमी पार्टीचे संपर्कप्रमुख विजय नायर यांच्याशी कविता सातत्याने संपर्कात होत्या. त्यामुळे या प्रकरणात गेल्या वर्षी ईडीने पहिल्यांदा त्यांना समन्स बजावले होते. दिल्लीच्या दारू घोटाळ्याच्या आरोपावरून विजय नायरला तपास यंत्रणेने अटक केली होती. के. कविता यांना पीएमएलएच्या कलम 3 आणि कलम 4 अंतर्गत मनी लॉन्ड्रीच्या आरोपाखाली अटक केली होती.

CBI Arrested K. Kavitha

Arvind Kejriwal : केजरीवालांना झटका! ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने फेटाळली याचिका

Leave a Comment