Cars with 6 Airbags : 10 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येतात ‘या’ सहा एअरबॅग असणाऱ्या कार्स, पहा लिस्ट

Cars with 6 Airbags : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बातमी आहे. तुम्ही आता 10 लाखांपेक्षा स्वस्तात सहा एअरबॅग असणाऱ्या कार्स खरेदी करू शकता.

टोयोटा ग्लान्झा

टोयोटाने प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये ग्लान्झा ऑफर केली असून कंपनीच्या या कारमध्ये सहा एअरबॅगही दिल्या आहेत. भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत 6.86 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई i10

ह्युंदाई ही सहा एअरबॅगसह i-10 Grand Nios ऑफर करते. सहा एअरबॅगसह येणारी ही सर्वात स्वस्त कार असून हे वैशिष्ट्य कंपनीने या कारमध्ये मानक म्हणून देण्यात आले आहे. किमतीचा विचार केला तर या कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते.

मारुती स्विफ्ट

देशातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी मारुतीने हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्विफ्ट ऑफर केली असून या कारची नवीन पिढी मे 2024 मध्येच लॉन्च केली आहे. यात सहा एअरबॅग कंपनीने मानक म्हणून दिल्या आहेत. किमतीबद्दल बोलायचे झाले तर एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई i20

ह्युंदाईने प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये i-20 ऑफर केली असून कंपनीची ही दुसरी कार आहे ज्यात मानक म्हणून सहा एअरबॅग्ज दिल्या आहेत. कारची एक्स-शोरूम किंमत 7.04 लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा अल्ट्रोझ रेसर

Altroz ​​Racer देखील Tata कडून सहा एअरबॅग्ससह स्टँडर्ड म्हणून ऑफर केली जात असून कंपनीने नुकतीच ही कार भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

Leave a Comment