हिवाळ्यात गाजराचे भरपूर सेवन केले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. हे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये गाजर समाविष्ट करू शकता.यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. चमकदार त्वचेसाठी तुम्ही गाजराचा फेस पॅक वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया, घरी कसा बनवायचा गाजराचा फेस पॅक.
मुलतानी माती आणि गाजर ; जर तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल्सपासून मुक्ती मिळवायची असेल तर हा पॅक नक्की वापरा. यासाठी १ चमचे मुलतानी मातीमध्ये गाजराचा रस आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटांनी पाण्याने धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून 1-2 वेळा केली जाऊ शकते.
मध आणि गाजर पॅक : जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला या फेस पॅकने आराम मिळू शकतो. यासाठी प्रथम गाजर किसून घ्या, त्यात एक चमचा मध आणि कच्चे दूध घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा, 10-15 मिनिटांनी पाण्याने धुवा.
Healthy Lungs Tips: फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी दररोज “या “फळांचे सेवन करा
Kids Health:व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये “हे” आजार होऊ शकतात
तांदूळ आणि गाजर फेस पॅक : हे करण्यासाठी, प्रथम तांदूळ बारीक करा, आता त्यात किसलेले गाजर घाला. या मिश्रणात कच्चे दूध घालून पेस्ट बनवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चिमूटभर हळदही घालू शकता. आता चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटांनी पाण्याने धुवा. हा पॅक सुरकुत्यापासून आराम मिळवण्यास मदत करू शकतो.
दही आणि गाजर : यासाठी गाजराचा रस दोन चमचे दह्यात मिसळा. या मिश्रणात अंड्याचा पांढरा भाग घालून चांगले फेटून घ्या. आता पेस्ट चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटांनी पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.