Credit Card : आजकाल क्रेडिट कार्ड (Credit Card) मिळवणे खूप सोपे आहे. तुमचे पगार खाते (Salary Account) असल्यास बँका तुम्हाला सहज क्रेडिट कार्ड देतात. परंतु बऱ्याच वेळा प्रथमच क्रेडिट कार्ड वापरणारे नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते किंवा कर्जाच्या जाळ्यात अडकावे लागते. तुम्ही जर प्रथमच क्रेडिट कार्ड घेतले असेल तर कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊ या..
मिनिमम पेमेंट
जेव्हा जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल तयार होते. वापरकर्त्याला दोन पेमेंट पर्याय दिले जातात. पहिला पर्याय पूर्ण पेमेंट आहे, तर दुसरा पर्याय किमान पेमेंट आहे. बर्याच वेळा असे दिसून येते की बर्याच वेळा युजर किमान पेमेंटचा पर्याय निवडतात. आणि त्याच्या बिलावर भारी व्याज आकारले जाऊ लागते आणि तो कर्जाच्या जाळ्यात अडकतो. यामुळे क्रेडिट कार्डचे बिल नेहमीच पूर्ण भरत जाणे केव्हाही चांगले.
क्रेडिट कार्ड लिमिट पूर्ण वापरू नका
जे पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत असतात ते बऱ्याचदा पूर्ण क्रेडिट मर्यादेचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअरही घसरतो. नेहमी क्रेडिट कार्ड मर्यादेच्या फक्त 30 ते 40 टक्के वापरा, यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील चांगला राहतो.
आंतरराष्ट्रीय व्यवहार टाळा
क्रेडिट कार्ड युजर्स अनेकदा आकर्षक ऑफर्सच्या नादात आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात. या व्यवहारात वापरकर्त्यांना खूप जास्त विदेशी चलन व्यवहार शुल्क भरावे लागते. सामान्यतः क्रेडिट कार्डऐवजी प्रीपेड कार्ड वापरणे चांगले मानले जाते.