Car Resale Value : जुनी कार जास्त किंमतीत विकायचीय? मग ‘या’ टिप्स पक्क्या लक्षात ठेवाच!

Car Resale Value : तुमच्याकडे जर एखादी कार असेल तर त्या कारची व्यवस्थित देखभाल करत (Car Resale Value) रहा. कारण तुमच्या कारचे मूल्य दिवसेंदिवस किलोमीटर दर किलोमीटर वापरामुळे आणि वेळ गेल्यामुळे कमी होत असते. तथापि जर तुम्ही भविष्यात तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर येथे काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्याद्वारे जुन्या वाहनांची विक्री करताना त्याचे जास्तीत जास्त मूल्य तुम्हाला मिळविता येईल.

नेहमी वेळेवर सर्व्हिसिंग करा

कारची वेळेवर सर्विसिंग करणे केवळ वाहनाच्या आरोग्यासाठी चांगले नाही तर त्याचे पुनर्विक्री मूल्य वाढण्यास देखील मदत होते. कारची नियमित सर्विसिंग आणि देखभाल यामध्ये ऑइल बदलणे, टायरची दुरुस्ती, ब्रेक बदलणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. यामुळे कार सुरळीत चालते आणि तिचे आयुष्य देखील वाढते.

FD Rate : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! या बँकेच्या FD वर मिळतंय बंपर व्याज

Car Resale Value

सर्व्हिस रेकॉर्ड ठेवा

वेळेवर सर्विसिंग करताना कार सर्वोत्तम स्थितीत असल्याची नेहमी खात्री करा तसेच तुम्ही कारच्या सर्व्हिसिंग केल्याची नोंद ठेवत चला. यामुळे कारची विक्री करताना त्याचे पुनर्विक्री मूल्य वाढण्यास मदत होते. कार देखभालीचे वेळापत्रक ठेवणे हा वाहनाची देखभाल करण्याचा आणि ते वाहन सुरळीत चालेल याची खात्री करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. सर्विस रेकॉर्ड ठेवणे योग्य वाहन दस्तऐवजीकरणाचा देखील भाग आहे. तुम्ही ठेवलेल्या इतर दस्तऐवजांमध्ये पावत्या, इतर कागदपत्रे यांचा समावेश होतो.

कार नेहमी स्वच्छ ठेवा

कार नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. यामुळे कार चांगली दिसते तसेच त्याचे पुनर्विक्री मूल्य देखील वाढते. स्वच्छ कारची किंमत नेहमीच जास्त मिळते. कारची स्वच्छता राखणे संभाव्य खरेदीदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण कार स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी सर्विसिंग करणे, आवश्यक असल्यास कव्हर करून ठेवणे देखील गरजेचे ठरते.

Redmi Smartphone Offer : प्रथमच 200MP कॅमेरा असणाऱ्या फोनवर मिळतेय बंपर सवलत, पहा ऑफर

Car Resale Value

दुरुस्तीकडे दुर्लक्ष नको

कार खरेदी करण्याआधी ग्राहक बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो. कारची पाहणी करूनच कार खरेदी करायची की नाही याचा निर्णय घेतला जातो. तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल तर संभाव्य खरेदीदाराला प्रभावित करण्यासाठी स्वच्छ आणि नीटनेटकी कार असणे खूप गरजेचे आहे. कार फक्त बाहेरून स्वच्छ असून चालणार नाही तर आतील बाजूने देखील कार स्वच्छ असलेच पाहिजे. कारच्या केबिनमध्ये जितकी स्वच्छता जास्त असेल तितके त्या कारचे मूल्य वाढण्याची शक्यता जास्त राहते. यासाठी नियमितपणे कारची स्वच्छता आणि देखभाल करणे गरजेचे ठरते. कारच्या केबिनमधील कचरा काढून टाकण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर वापरा.

टेक्नॉलॉजी अपडेट करा

ब्लूटूथ ऑडिओ स्ट्रीमिंग सिस्टम, रियर व्ह्यू कॅमेरा किंवा नेवीगेशनसह टचस्क्रीन यांसारखे वैशिष्ट्ये जोडल्याने कार संभाव्य खरेदीदारासाठी अधिक चांगला पर्याय ठरू शकते म्हणून कार विकण्याआधी तिचे सर्वांगीण मूल्य वाढण्यासाठी अशा वैशिष्ट्यांसह कार अपडेट करणे नेहमी फायद्याचे ठरू शकते.

Leave a Comment