Car offer । घाई करा! महिंद्रा ते मारुती पर्यंतच्या ‘या’ कार्सवर मिळतेय 4 लाखांची सवलत, पहा ऑफर

Car offer । तुम्ही आता कार खरेदीवर तब्बल 4 लाख रुपयांची बचत करू शकता. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सर्व टॉप मॉडेलवर हजारोंची बचत करता येईल. कोणत्या कारवर मिळत आहे, अशी ऑफर जाणून घ्या.

Hyundai ऑफर

जुलै महिन्यात, Hyundai आपल्या 6 आणि 7 सीटर Alcazar वर खूप चांगल्या ऑफर देत असून तुम्ही 31 जुलै रोजी किंवा स्टॉक संपण्यापूर्वी Alcazar खरेदी केली तर तुम्हाला त्यावर 85,000 रुपयांची पूर्ण सवलत मिळेल. ही एक प्रीमियम एसयूव्ही असून त्यात दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. Verna वर 35,000 रुपयांपर्यंत सवलत देण्यात आहे तर i20 च्या CVT प्रकारावर 30,000 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. कॉम्पॅक्ट सेडान Aura च्या CNG प्रकारावर 43,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

Maruti Jimny ऑफर

जर तुम्ही या महिन्यात मारुती जिमनी खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर 3.30 लाख रुपयांपर्यंत शानदार सवलत मिळेल. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले असून हे 4 व्हील ड्राइव्ह पर्यायासह येते. हे ऑन-रोड आणि ऑफ-रोड पृष्ठभागांवर सहजपणे चालविता येईल. हे डिझाइनच्या बाबतीत प्रभावित करते. त्याचा कॉम्पॅक्ट आकार सिटी ड्राईव्हसाठी उपयुक्त ठरू शकतो.

Mahindra XUV 700 ऑफर

जर तुम्ही या वीकेंडला Mahindra XUV 700 खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला खूप फायदा होईल. या SUV मध्ये 2.20 लाख रुपयांची कपात केला आहे. कंपनीकडून XUV 700 च्या AX7 प्रकाराची किंमत 2.20 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. किमतीचा विचार केला तर आता या प्रकाराची किंमत 21.39 लाख रुपयांपासून सुरू होते. XUV700 च्या 3 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने सूट दिली आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये XUV700 खरेदी करू शकता. कारमध्ये 2.0L पेट्रोल आणि 2.2L डिझेल इंजिन आहे. दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहेत.

MG Gloster ऑफर

सवलतीचा विचार केला तर MG Motor आपल्या Gloster वर Rs 4 लाखपर्यंत सूट देत आहे. 2024 च्या मॉडेलवर 3.35 लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. कारची किंमत 38.80 लाख रुपये आहे. ग्लोस्टरमध्ये सर्वात प्रगत वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या SUV मध्ये 1996 cc चे डिझेल इंजिन आहे. कारमध्ये 8-स्पीड एटी गिअरबॉक्सची सुविधा दिली असून हे 7 सीटर मॉडेल आहे.

Tata Harrier आणि Safari वर ऑफर

टाटा मोटर्स या महिन्यात आपल्या दोन SUV वर चांगली सूट देत असून या महिन्यात सफारीवर १.४० लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. सफारीच्या किमती आता रु. 15.49 लाख ते रु. 25.34 लाखांपर्यंत असून हॅरियरची किंमत 1.20 लाख रुपयांनी कमी केली आहे. हॅरियरच्या किमती आता 14.99 लाख ते 24.54 लाख रुपयांपर्यंत आहेत.

Leave a Comment