Car Mileage Tips : जर तुमच्याकडे कार असेल आणि कारच्या मायलेजबद्दल काळजीत (Car Mileage Tips) असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हालाही तुमच्या कारचे मायलेज वाढवायचे आहे तर आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या कारचे मायलेज वाढवू शकता.
नेहमी कंपनीचे टायर घ्या
जेव्हा जेव्हा कारचा टायर खराब होतो, तेव्हा फक्त कंपनीचे टायरच लावावेत कारण, अन्य प्रकारचे टायर कधीकधी कारच्या वास्तविक टायरच्या आकारापेक्षा जास्त असतात. याचा थेट परिणाम कारच्या मायलेजवर होतो.
रुफ रेल्स
बहुतेक SUV मध्ये रूफ रेल उपलब्ध आहेत. ज्यावर लोक आपले सर्व सामान घेऊन जातात. हे पाहून काही लोक त्यांच्या छोट्या कारमध्ये हे लावतात, पण त्यामुळे कारच्या मायलेजवर परिणाम होतो.
कारच्या वेगाची काळजी घ्या
जर तुम्हालाही तुमच्या कारने चांगला मायलेज द्यावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमची कार जास्त वेगात चालवू नका. कारण कार जास्त वेगाने चालवल्याने मायलेज कमी होते. म्हणून आपल्या कारचा वेग ताशी वेग कमीच ठेवा.
टायरचा दाब नियमित ठेवा
प्रत्येक वाहनमालकाची पहिली जबाबदारी असते की ते आपल्या गाडीच्या टायरचे प्रेशर तपासत राहणे. गाडीच्या मालकाने गाडीच्या टायरचा दाब कायम ठेवला तर त्याची गाडी चांगला मायलेज देते.
रहदारी असलेले क्षेत्र टाळा
घर सोडण्यापूर्वी एकदा Google नकाशे तपासा जेणेकरून तुम्ही रहदारीच्या ठिकाणी जाणे टाळू शकता. ट्रॅफिकमध्ये वाहनाचे मायलेज कमी होऊ लागते. कारण त्यावेळी क्लचचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी कार चालवणे टाळावे.