Car Maintenance Tips : साधारणपणे वाहनांची देखभाल करणे सोपे असते. वाहन (Car Maintenance Tips) वेळोवेळी सर्विसिंग करणे गरजेचे असते. जर तुम्ही तुमचे वाहन वेळच्यावेळी सर्विसिंग आणि योग्य देखभाल करत असाल तर त्या वाहनाचे आयुष्य देखील वाढू शकते. कार मेंटेनन्समध्ये होणारी काही फसवणूक टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. साधारणपणे वाहनाची देखभाल करणे सोपे असते. कधी कधी अतिरिक्त देखभाल करणे देखील आवश्यक असते आणि जेव्हा वाहन अशा गोष्टींसाठी सर्विस सेंटरवर सोडले जाते त्यावेळी कधीतरी अनपेक्षित बिल येते हा अनुभव अनेकांनी घेतला असेल.
काही वेळा ही बिले फसवी असतात एक तर जास्त किंमत लावलेली असतात किंवा काही बदली न केलेल्या स्पेअर पार्ट्सचेही चार्जेस यामध्ये लावलेले आढळतात. कार मेंटेनन्समध्ये होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर केल्याने तुम्ही या फसवणुकीपासून दूर राहू शकता.
तज्ज्ञांकडून सल्ला घ्या
जेव्हा एखादी कार सर्विसिंगसाठी दिली जाते आणि मेकॅनिक तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची यादी देतो. त्यावेळी याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही सेकंड ओपिनियन घेण्यास अजिबात संकोच करू नका. तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही यामधील एखाद्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता.
Car Maintenance Tips
इंजिन फ्लश
कारला पूर्णपणे फ्लशची गरज आहे हा एक सामान्य सल्ला आहे. जरी काही प्रकरणांमध्ये हे खरे असू शकते परंतु ज्या कारचे ऑइल नियमितपणे बदलले जाते किंवा त्याची देखभाल नियमितपणे केली जाते तेव्हा त्या कारला इंजिन फ्लशची अजिबात गरज नसते. वर्कशॉपमध्ये आणि काही वेळा अधिकृत सर्विस सेंटर मध्ये ही एक सामान्य फसवणूक ठरू शकते. त्यामुळे याबाबत काळजी घ्या.
फ्लुइड फ्लश
इंजिन प्लशप्रमाणे फसवणूक आहे. अनेक मेकॅनिक ग्राहकांचे दिशाभूल करण्यासाठी याचा वापर करतात. बहुतेक प्रकरणांमध्ये ग्राहकही यामध्ये फसले जात असल्याचे आढळून आले आहे. इंजिन प्लशप्रमाणे नियमित देखभाल होणाऱ्या कारला त्याची आवश्यकता नसते आणि बऱ्याच बाबतीत फक्त एकदा रिफील करण्याची गरज असते.
Car Maintenance Tips
Old Car Problems : जुन्या कारमध्ये वारंवार उद्भवतात ‘हे’ 4 Problem; मग, नवी कार घेणेच ठरेल फायद्याचे
स्पेअर पार्ट बदलणे
बहुतेक ठिकाणी फक्त ब्रेक पॅड, केबल्स, बेल्ट फिल्टर असे काही भाग बदलले जातील. तथापि काही ठिकाणी ते फक्त अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी देखील बदलले जाऊ शकतात आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा काही ठिकाणी तुमच्याकडून पैसे घेतले जातात परंतु ते कारमधील स्पेअर पार्ट्स बदलले जात नाहीत. या गोष्टीचा अनुभव आपल्याला नंतर येतो परंतु वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे कार किंवा तुमचे वाहन सर्विसिंगला टाकताना या गोष्टींची अगोदर खात्री करून घ्या.
जास्त चार्ज आकारणे
ही सर्वात मोठी फसवणूक आहे जेव्हा सर्विस सेंटर तुमच्याकडून सर्विस शुल्काच्या नावाखाली जास्त पैसे आकारतात. तुम्हाला आधी अंदाज आल्याची खात्री करा आणि तुम्हाला वाटत असेल की हे बरोबर नाही किंवा तुम्हाला काही संशय वाटत असेल तर तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊ शकता. तुमच्या कार सर्विसिंगचे बिल किती आले आहे, यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे याची माहिती घेण्यात बिलकुल घाबरू नका.