Car Loan Tips : मुंबई : सध्या दिवाळीच्या (Diwali 2022) सणात अनेकांनी चारचाकी वाहन खरेदी करण्याचा प्लान केला आहे. तर काही जण कार खरेदीचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत कर्ज घेऊन कार खरेदीचाही पर्याय असतो. अनेक जण हा पर्याय घेतात. बँका, फायनान्स कंपन्या लोन देतात. मात्र, लोन घेताना काही गोष्टी (Car Loan Tips) अत्यंत महत्वाच्या असतात. त्याची माहिती तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, बँका आणि कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी प्रत्येक बाबतीत माहिती देतीलच असे नाही. अशा वेळी आपणच जागरूक राहणे केव्हाही चांगले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्ही सहजपणे कार लोन (Car Loan) घेऊ शकाल. चला जाणून घेऊ या कार लोन घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
सर्वात कमी व्याजदराने कर्ज घ्या
तुम्हाला कोणती बँक कमीत कमी व्याजदराने (Low Interest For Car Loan) कर्ज देऊ शकते हे सर्व बँकांचे व्याजदर तपासले पाहिजे. यानंतर, तुम्ही सर्वात कमी व्याजदराने कार लोन घ्यावे. यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया सारख्या बँकांना प्राधान्य देऊ शकता, जिथून तुम्हाला 7% पेक्षा कमी व्याजदराने कार कर्ज मिळू शकते.
कर्जाचा कालावधी
कार लोन घेताना तुम्ही कर्जाच्या कालावधीकडे (Loan Period) लक्ष दिले नाही तर तुम्हाला खूप पश्चाताप होईल. हे लक्षात ठेcarवले पाहिजे. बर्याच वेळा लोक स्वस्त ईएमआयच्या (EMI) नादात त्यांचा ईएमआय बराच काळ ठेवतात आणि कारचे कर्ज फेडताना काळजी करू लागतात. यामुळे तुमचे खूप नुकसान होते, कारण तुम्ही बँकेला व्याजाच्या स्वरूपात जास्त पैसे देत आहात. कार कर्जाचा कालावधी नेहमी शक्य तितका लहान ठेवा, जेणेकरून तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल.
देय तारखेपूर्वी EMI भरा
देय तारखेपूर्वी EMI भरण्याचे अनेक फायदे आहेत. EMI थांबल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) खराब होतो. तुम्ही अतिरिक्त चार्जेस देण्यापासून वाचले पाहिजे. जर तुम्ही वेळेवर कार कर्जाची परतफेड केली नाही, तर तुमची स्वप्ने देखील भंग पावू शकतात.
जर तुमची योजना महागडी कार खरेदी करायची असेल, तर तुम्हाला आतापासून चांगला सिबिल स्कोअर (Cibil Score) असणे आवश्यक आहे. तुमचा सिबिल स्कोअर 750 च्या वर असेल तरच तुम्हाला मोठी कर्ज ऑफर मिळू शकते.
- हे सुद्धा वाचा : Diwali Festival Car Discount: कार घेण्यापूर्वी चेक करा की डिस्काऊंट; मगच करा निवड
- Best Car : दिवाळीत कार खरेदी करताय.. मग, ‘या’ आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या दमदार कार; चेक करा डिटेल..
- Car : एप्रिलनंतर बसणार खिशाला झटका.. ‘त्यामुळे’ वाढणार चारचाकीच्या किंमती; जाणून घ्या..