Car Driving Tips : कार चालवताना कटाक्षाने टाळा ‘या’ चुका, कमी होईल मायलेज; कसं ते जाणून घ्या

Car Driving Tips : भारतीय बाजारात विविध कार निर्मात्या कंपन्या आपल्या शानदार फीचर्स दमदार मायलेज असणाऱ्या कार्स लाँच करत असतात. बाजारात आता पेट्रोल,डिझेल तसेच इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. काही कारचालक कार चालवत असताना काही चुका करतात. यामुळे कारचे मायलेज कमालीचे कमी होते. त्यामुळे कार चालवताना काही चुका टाळाव्यात.

गियर शिफ्टिंगची घ्यावी काळजी

ज्यावेळी तुम्हाला लाल सिग्नल मिळेल, तेव्हा कार फक्त न्यूट्रलमध्ये ठेवा आणि लगेचच क्लच सोडा. ज्यावेळी सिग्नल हिरवा होतो, तेव्हा फक्त काही सेकंद वाचवण्यासाठी कार पहिल्या गियरमध्ये ठेवणे अजिबात बरोबर नाही. यामुळे तुमच्या गियर आणि क्लचवर अनावश्यक प्रभाव पडतो.

RPM समजून घ्या

जेव्हा तुम्ही मॅन्युअल कार चालवत असता, तेव्हा गीअर बदल हे सर्व काही असते आणि योग्य वेळी गीअर्स बदलले तर वाहनाचे आयुष्य वाढते. याशिवाय, इंजिनचे आरोग्य आणि इंधन कार्यक्षमता सुधारते. नियम असा आहे की गीअर्स 2,500 आणि 3,000 RPM दरम्यान बदलणे गरजेचे आहे.

जरी हा सराव तुम्हाला सुरुवातीला थोडा त्रास देऊ शकतो, परंतु कालांतराने तुम्हाला रिव्ह्स पाहण्याची गरज पडणार नाही. एकदा तुम्हाला अनुभव आला की, वाहनाचा आवाजच तुम्हाला सांगेल की गीअर्स बदलण्याची योग्य वेळ कधी असेल.

ठेवू नका क्लचवर पाय

अनेक कारचालकांना अशी सवय असते की जेव्हा त्यांना क्लच दाबण्याची गरज नसते त्यावेळी ते आपला पाय क्लचवर ठेवत असतात. पण हे लक्षात ठेवा की बराच काळ क्लचवर लावलेला हा थोडासा दाब तो बर्न करू शकतो. असे झाले तर तुमच्या कारचे क्लच लवकर खराब होतील आणि तुम्हाला तुम्ही सवय लवकर बदलावे लागेल.

Leave a Comment