Car Discount : त्वरा करा! ‘या’ स्टायलिश कारवर मिळत आहे 1.50 लाखांपर्यंतची सवलत, पहा ऑफर

Car Discount : तुम्ही कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आह. तुम्ही आता या महिन्यात कार खरेदी केली तर तुम्हाला स्टायलिश कारवर 1.50 लाखांपर्यंतची सवलत मिळेल. या कारवर उत्तम फीचर्स आणि मायलेज मिळेल.

टाटा कारवर मिळेल 1.25 लाखांची सवलत

या महिन्यात टाटा सफारी आणि हॅरियरवर 1.25 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. या सवलतीमध्ये रु. 75,000 रोख सवलत आणि रु. 50,000 एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. पण हे लक्षात ठेवा की ही सवलत नवीन प्रकारांवर नाही तर मे 2023 च्या प्री-फेसलिफ्ट प्रकारांवर आहे.

ही कंपनी प्री-फेसलिफ्ट Nexon वर Rs 90,000 पर्यंत सवलत देत असून तुम्हाला नवीन Tiago आणि Tigor वर Rs 40,000 पर्यंत बचत करता येईल. याशिवाय Tata Altroz ​​वर 55,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 6.65 लाख रुपयांपासून ते 10.80 लाख रुपयांपर्यंत आहे. तर टाटा पंचवर 10,000 रुपयांपर्यंत बचत करता येईल.

मारुती सुझुकीवर मिळेल डिस्काउंट

तुम्हाला मारुती वॅगन आर वर ६३,००० रुपये वाचवता येतील. किमतीचा विचार केला तर या कारची एक्स-शो रूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. कुटुंबासाठी ही एक चांगली कार असून Celerio वर तुम्हाला 58,100 रुपयांची सवलत मिळेल. या कारची किंमत 5.36 लाख रुपयांपासून सुरू होते.

कंपनी आपल्या मायक्रो SUV S-Presso वर 58,100 रुपयांची सवलत देत आहे. कारचे डिझाइन आणि इंजिन परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट असून कारची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही कंपनीची छोटी कार Alto K10 खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला त्यावर 63,100 रुपयांची मोठी बचत होईल. कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Honda वर मिळेल 1.14 लाख रुपयांची सवलत

या महिन्यात तुम्ही होंडा कारवर मोठी बचत करता येईल. तुम्ही Honda Amaze खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला या कारवर 96,000 रुपयांची सवलत मिळेल. तुम्ही Honda City eHEV वर 65,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

नॉर्मल सिटीवर 1,14,500 रुपये वाचवण्याची संधी असून एलिव्हेटच्या खरेदीवर 55,000 रुपये वाचवण्याची संधी मिळत आहे. 4 ते 12 मे या कालावधीत ग्राहक या सवलतींचा लाभ घेऊ शकतात.

एमजी कारवर मिळेल 1.50 लाख रुपयांची सवलत

या महिन्यात MG Motor आपल्या कारवर 1 लाख रुपयांपर्यंत सवलत देत असून या EV वर तुम्ही 25,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तुम्हाला MG ZS EV वर 50,000 रुपयांची सवलत मिळेल. या कारवर 1.50 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. एस्टरच्या खरेदीवर तुम्हाला ६० हजार रुपये वाचवता येतील. Gloster वर तुम्हाला 1.50 लाख रुपयांची सवलत मिळत असून या सवलतीमध्ये एक्सचेंज फायदे समाविष्ट आहेत.

कारवर 1.50 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत असून एस्टरच्या खरेदीवर तुम्ही ६० हजार रुपये वाचवू शकता. तर Gloster वर तुम्हाला 1.50 लाख रुपयांची शानदार सवलत मिळू शकते. सवलतीमध्ये एक्सचेंज फायदे मिळतील.

Leave a Comment