Car Discount । भारीच! MG, Hyundai आणि Tata च्या कारवर मिळतेय लाखो रुपयांची सवलत, पहा भन्नाट ऑफर

Car Discount । जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. तुम्ही आता MG, Hyundai आणि Tata च्या कारवर लाखो रुपयांची बचत करू शकता. पहा संपूर्ण ऑफर.

MG Gloster ऑफर

MG या महिन्यात तिच्या फुल साइज SUV Gloster वर 4.10 लाख रुपयांची सवलत मिळत असून या ऑफर त्याच्या 2023 मॉडेल्सवर देण्यात येत आहेत. या संपूर्ण सवलतीमध्ये एक्सचेंज सवलत, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. तर 2024 मॉडेलवर 3.35 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

Hyundai Alcazar वर मिळतेय 85,000 रुपयांची सवलत

जुलै महिन्यात, Hyundai आपल्या 6 आणि 7 सीटर Alcazar वर खूप चांगल्या ऑफर देत असून आता तुम्ही 31 जुलै रोजी किंवा स्टॉक संपण्यापूर्वी Alcazar खरेदी केली तर तुम्हाला त्यावर 85,000 रुपयांची पूर्ण सवलत मिळेल. ही एक प्रीमियम एसयूव्ही असून त्यात दोन इंजिन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सध्या, Hyundai नवीन Alcazar ची चाचणी करत आहे जी लवकरच भारतात लॉन्च करण्यात येईल. इतकेच नाही तर Hyundai या महिन्यात सेडान कार Verna वर 35,000 रुपयांपर्यंत शानदार सवलत देत आहे. या कारमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय मिळतील. Hyundai i20 च्या CVT प्रकारावर 30,000 रुपयांपर्यंत सवलत देत Hyundai Aura च्या CNG प्रकारावर 43,000 रुपयांपर्यंत सवलत देत आहे.

Tata च्या कारवर मिळत आहे प्रचंड सवलत

हे लक्षात घ्या की Tata च्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Nexon वर या महिन्यात चांगली सवलत मिळत आहे. कंपनीने यावर 60,000 रुपयांची सवलत दिली असून ही सवलत ३१ जुलैपर्यंत लागू असेल. या सवलतीमध्ये एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. टाटा पंचवर या महिन्यात केवळ 3000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस दिला जात असून कंपनी आपल्या हॅचबॅक कार Altroz ​​वर 25,000 रुपयांपर्यंत शानदार सवलत देत आहे. ही कार तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये खरेदी करता येईल.

तुम्ही Tata Tigor खरेदी करण्याचा विचार करत असल्यास या महिन्यात त्यावर 55,000 रुपयांपर्यंत सवलत दिली जातेय. यात 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. तर Tigor CNG वर 25,000 रुपयांची सूट मिळत आहे आणि Tata Harrier वर 38,000 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

Leave a Comment