Car Discount : तुम्ही आता टाटाच्या दोन कारवर शानदार सवलत मिळवू शकता, यामुळे तुम्हाला हजारो रुपयांची बचत करता येईल. तुम्हाला Tata Safari आणि Harrier वर 1.25 लाख रुपयांची सूट मिळेल. जाणून गया सविस्तर माहिती.
कारवर मिळेल 1.25 लाख रुपयांची सवलत
या महिन्यात टाटा सफारी आणि हॅरियरवर 1.25 लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. या सवलतीमध्ये रु. 75,000 रोख सवलत आणि रु. 50,000 एक्सचेंज बोनस यांचा समावेश केला आहे. पण हे लक्षात ठेवा की ही सूट नवीन प्रकारांवर नाही तर मे २०२३ च्या प्री-फेसलिफ्ट प्रकारांवर देण्यात येत आहे. नवीन प्रकारांवर कोणतीही सवलत नाही.
हे लक्षात घ्या की दोन्ही वाहनांमध्ये 2.0L डिझेल इंजिन असून जे 170hp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. किमतीचा विचार केला तर हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख ते 26.44 लाख रुपये इतकी आहे. तर सफारीची एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख ते 27.34 लाख रुपये इतकी आहे.
या कारवर मिळेल भरघोस सूट
ऑफर्सचा विचार केला तर कंपनी प्री-फेसलिफ्ट Nexon वर Rs 90,000 पर्यंत सवलत देत आहे, तर तुम्हाला नवीन Tiago आणि Tigor वर Rs 40,000 पर्यंत बचत करता येईल. इतकेच नाही तर Tata Altroz वर 55,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. या कारची किंमत 6.65 लाख रुपयांपासून ते 10.80 लाख रुपयांपर्यंत आहे.विशेष म्हणजे तुम्हाला टाटा पंचवर 10,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे.