Car Buying Tips : नवीन कार घेताना लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी, उत्तम डीलसह होईल लाखोंची बचत

Car Buying Tips : दरवर्षी लाखो लोक कार खरेदी करत असतात. अनेकजण कारचे संपूर्ण पैसे देऊन कार खरेदी करतात तर काहीजण कर्ज काढून कार खरेदी करतात. अनेकजण कमी पैशात जास्त फीचर्स देणारी कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे पैसे वाचू शकतात.

बजेट तयार करा

कोणतीही नवीन कार घेण्यापूर्वी तुम्हाला तुमचे बजेट तयार करावे लागणार आहे. कारण आजकाल प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार कार बाजारात उपलब्ध असून तुम्ही तुमच्या बजेटपेक्षा जास्त कार खरेदी केली तर तिचा EMI तुम्हाला नंतर त्रास देऊ शकतो.

गरजेनुसार कार निवडा

बजेट ठरवल्यानंतर तुम्ही तुमची कार निवडा. कारण आजकाल सगळ्याच गाड्या चांगल्या असून इतरांना पाहून कार घेणे टाळा. कारण याठिकाणी तुम्हाला पैसे आणि ईएमआय देखील भरावा लागतो. समजा तुम्ही वाहन फक्त लोकल वापरत असाल तर तुमच्यासाठी छोटी कार सर्वात उत्तम असणार आहे आणि जर तुम्ही वीकेंडला किंवा कुटुंबासोबत लांबच्या सहलीला गेल्यास तर तुम्ही एमपीव्ही बघू शकता.

एकाधिक डीलर्सशी साधा संपर्क

तुम्ही जी कार खरेदी करणार आहात त्याबद्दल वेगवेगळ्या डीलर्सशी बोलून घ्या आणि सर्वात उत्तम ऑफर आणि डील्ससाठी विचारा. तुम्हाला सर्वोत्तम सेवा आणि ऑफर देण्याच्या डीलरसोबत अंतिम करार करा.
जाणून घ्या कर्जाबद्दल

जर तुम्हाला नवीन कार खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्यास विविध बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घ्या आणि सर्वात कमी व्याज देणाऱ्या बँकेकडे कर्ज फायनल करणे गरजेचे आहे.

विमा आणि पॉलिसी

कार खरेदी करण्यासोबतच तुम्हाला अनेक कंपन्यांच्या पॉलिसींची संपूर्ण माहिती मिळवावी लागणार आहे कारण काहीवेळा विमा कंपन्या त्यांच्या पॉलिसीवर अनेक प्रकारच्या सूटही देतात ज्याचा तुम्हाला फायदा होतो.

Leave a Comment