दिल्ली – पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या राजकीय संकट सुरू आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनाही आपली खुर्ची गमवावी लागू शकते. एकीकडे संपूर्ण विरोधक त्यांच्यावर टीका करण्यात व्यस्त आहेत, तर त्याची माजी पत्नी रेहम खाननेही (Reham Khan) यात उडी घेतली आहे. इम्रानच्या पत्नीने ट्विट केले की, इम्रान आता इतिहासजमा झाला आहे.
रेहम खानने तिच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, इम्रान आता इतिहास झाला आहे. मला वाटते की, नया पाकिस्तानने मागे सोडलेली त्यांची घाण साफ करण्यासाठी आपण एकत्र उभे राहिले पाहिजे. वास्तविक, इम्रान खान 2018 मध्ये नया पाकिस्तानचा नारा देत सत्तेवर आले होते. इम्रान खानकडे सर्व काही आहे, पण या माणसाकडे शहाणपण नाही, असे रेहम खानने यापूर्वी म्हटले होते. तुम्ही पंतप्रधान नसताना पाकिस्तान महान होता, असे ते म्हणाले.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळतो
अविश्वास प्रस्तावानंतर इम्रान खान यांची कधीही सत्तेतून हकालपट्टी होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, खुद्द इम्रान खान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. इम्रान खान यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना आपण राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. मी 20 वर्षे क्रिकेट खेळलो आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळतो. मी माझ्या आयुष्यात कधीही हार मानली नाही.
इम्रान खान यांची हत्या होऊ शकते
पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद खान म्हणाले की, इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावापूर्वी मारले जाऊ शकते. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉन वृत्तपत्राने चौधरी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या वृत्तांनंतर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.