Canara bank finance: मुंबई (Mumbai) : कॅनरा बँकेची सबसिडरी कंपनी असलेल्या ‘कॅन फिन होम्स’ (Can Fin Homes) यांच्याबाबत ही एक महत्वाची बातमी आहे. ही गृहकर्ज कंपनी (home loan company) तब्बल ४ हजार कोटी रुपयांपर्यतचे कर्ज भांडवल उभारण्याची योजना आखत आहे. ही कंपनी या महिन्याच्या अखेरीस या प्रस्तावावर संचालक मंडळाची मंजुरी घेणार असल्याचे वृत्त आहे. कंपनीने अधिकृतपणे याबाबत माहिती दिलेली आहे. बिजनेस स्टँडर्डने याबाबत त्यांच्या ट्विटर खात्यावर बातमी शेअर केली आहे.
#CanaraBank promoted housing loan provider Can Fin Homes is planning to raise debt capital of up to Rs 4,000 crore and will seek board of directors' approval on this proposal later this month.#Homeloanshttps://t.co/uq8lxgU0ne
— Business Standard (@bsindia) October 6, 2022
याबाबत कंपनीने सांगितले आहे की, ती चालू आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंतच्या कालावधीत एक किंवा अधिक टप्प्यात ही रक्कम वाढवणार आहे. कॅनरा बँकेचा २९.९९ टक्के हिस्सा हा कॅन फिन होम्समध्ये आहे. कॅन फिन होम्सने गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला (bombay Stock Exchange) पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर ४ हजार कोटी रुपयांपर्यंतचे नॉन-कन्व्हर्टेबल रिडीमेबल डिबेंचर जारी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला जाईल.” तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील (loans in the housing sector) कर्ज वाटप करणाऱ्या या कंपनीने सांगितले आहे की, यापूर्वी भागधारकांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क्रेडिट वर्धित योजना (credit enhancement scheme) मंजूर केली होती.
- Must read :
- Bank Holidays: बँकवाल्यांची होणार चांदी; ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या..!
- Money Making Scheme: सरकारी योजनेतून मिळणार प्रतिमाह रु. 50,000; वाचा गुंतवणुकीची महत्वाची स्कीम
- Agriculture News: केळी-भाजीपाला पिकाची ‘ही’ घ्या काळजी; लम्पीवरही करा प्रतिबंधक उपाययोजना
- Modi government: 25 वर्ष येणार नाही वीज बिल; सरकारने आणली ‘भन्नाट’ योजना..
कॅन फिन होम्सचे शेअर्स बीएसईवर प्रत्येकी ४९९.६० रुपयांवर ट्रेडिंग करत आहेत. मागील दिवसाच्या क्लोजिंगच्या तुलनेत ते ०.८२ टक्क्यांनी वाढले आहेत. सप्टेंबर तिमाही आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक निकालांना मंजुरी देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची १७ ऑक्टोबर २०२२ रोजी बैठक होणार आहे. त्यामध्येही आणखी काय निर्णय होतात याकडे बाजाराचे लक्ष असेल. भाग भांडवल उभारणी केल्यानंतर कंपनी आणखी वेगाने होम लोन सेक्टरमध्ये कार्यरत राहणार आहे. परिणामी दिवाळीच्या सणासुदीच्या कालावधीत (festive season of Diwali offer) कर्ज घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना (customers) आणखी एक सक्षम पर्याय मिळणार आहे.