Canada Accused Pakistan : कॅनडाच्या निशाण्यावर पाकिस्तान; सरकारच्या ‘त्या’ दाव्याने पाकिस्तानात खळबळ!

Canada Accused Pakistan : कॅनडाने आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला (Pakistan) आहे. कॅनडा सरकारने (Canada Accused Pakistan) पाकिस्तानवर नुकताच एक मोठा आरोप केला आहे. कॅनडामध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. त्याआधी जस्टिन ट्रुडो यांच्या (Justin Trudeau) नेतृत्वातील सरकारने पाकिस्तानवर गंभीर आरोप केला आहे. आगामी निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप दिसून येईल, असा आरोप कॅनडा सरकारने केला आहे. अलीकडेच एका गुप्तचर अहवालाचा अहवाला देत फोटो सरकारने दावा केला होता की 2019 आणि 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बाहेरील देशांचा हस्तक्षेप दिसून आला आहे. आता कॅनडा आणि हे पाकिस्तानवर असाच आरोप केला आहे.

पाकिस्तानआधी कॅनडाने भारत आणि चीनवर देखील (China) असाच आरोप केला होता. या दोन्ही देशांनी कॅनडातील निवडणुकीत हस्तक्षेप केला होता असे सरकारने म्हटले होते. यानंतर ट्रुडो यांच्या सरकारने एक तपास समिती स्थापन केली होती. त्यावेळी भारत आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले होते. ताज्या अहवालात या यादीत चीनचं नाव आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. कॅनडाच्या न्यायाधीश या खटल्याची सुनावणी करत आहेत. त्यांनी म्हटले आहे की मिळालेल्या आकडेवारीनुसार चीनवर संशय येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. आगामी निवडणुकीत (Canada Election) चीनकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नसला तरी संशयाची सुई मात्र या देशाकडेही आहे.

China Taiwan Tension : तैवानने पुन्हा चीनला धमकावले! पहा, चीनने नेमकं काय केलं?

Canada Accused Pakistan

सध्या पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. आर्थिक समस्यांबरोबरच शेजारी देश अफगाणिस्तानातील तालिबान सरकारशी संघर्ष करत आहे. अलीकडेच पाकिस्तानने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढला आहे. 17 आणि 18 मार्च रोजी अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने हवाई हल्ला केला होता. या काळात पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले होते.

या हल्ल्यात साधारण बारा लोकांचा मृत्यू झाला होता. मारले गेलेले सर्व दहशतवादी आहेत असे पाकिस्तानचे म्हणणे होते. तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार जे लोक या हल्ल्यात मयत झाले ते सर्व नागरिक होते. हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही (Pakistan Afghanistan Tension) देशातील संबंध बिघडले आहेत. या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानला दिला होता. इतकेच नाहीतर तालिबाने पाकिस्तानी दुतावासाच्या प्रभारींनाही समन्स बजावले होते.

Cricket Australia : क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार

Canada Accused Pakistan

दोन्ही शेजारी देशांमध्ये वादाचे मुख्य कारण म्हणजे अफगाणिस्तानच्या जमिनीवर होणारी बेकायदेशीर पाकिस्तानी घुसखोरी. याशिवाय पाकिस्तानला एका गोष्टीचा राग आहे तो म्हणजे तालिबान आता त्याच्या इशाऱ्यावर काम करत नाही. एक काळ असा होता की तालिबान पाकिस्तानच्या इशाऱ्यावर सर्व काही करत होते.

मात्र सत्तेत आल्यापासून ते आता हुशारीने काम करत आहेत. हीच गोष्ट पाकिस्तानला जड जात आहे. तालिबान सरकारने त्यांच्या इशाऱ्यावर काम करावे असे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटते परंतु तालिबाने राज्यकर्ते आता पाकिस्तानला किंमत द्यायला तयार नाहीत. या कारणामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तालिबानी राज्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच वाद होतो आहे.

Leave a Comment