Cabinet meeting । निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारचा धडाका, घेतले महत्त्वाचे निर्णय

Cabinet meeting । कोणत्याही क्षणी केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. त्यापूर्वी राज्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्य सरकारची नुकतीच मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

आज लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू होईल. यानंतर लोकसभा निवडणुका संपेपर्यंत सरकार कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत.

दरम्यान, आठवडाभरात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक झाली असून हा एक प्रकारचा रेकॉर्ड म्हणावा लागेल. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या दोन बैठकीत 45 महत्त्वाचे निर्णय घेतले होते. राज्य सरकारने अवघ्या आठवडाभरात 62 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

 • ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. 50 कोटी अनुदान
 • भुलेश्वर जागेचे जिमखान्यासाठी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यांना वाटप
 • कॉम्प्युटेशनल जस्टिस एड सायन्सेसमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करणे. गुन्ह्यांची उकल वेगाने होणार.
 • ज्येष्ठ लेखक आणि कलाकारांना 5000 रुपये मानधन मिळणार
 • राजपत्रित अधिकारी महासंघच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर
 • श्रीगोंदा तालुक्यातील कृषी महामंडळाची जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित
 • कळंबोली येथील राज्याच्या सर्वोच्च संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाचे शुल्क माफ केले जाणार
 • 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती
 • मालमत्तेची विटंबना केल्याबद्दल आता एक वर्षाची शिक्षा होणार आणि दंडही वाढला
 • 138 जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्च मंजूर
 • संस्कृत, तेलगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापन करणे.
 • सरकारी आणि निमशासकीय ठिकाणी मोफत चित्रीकरण
 • विणकर समुदायासाठी आर्थिक विकास महामंडळ. 50 कोटी भाग भांडवल
 • पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ मिळणार.
 • हात उचलण्याची प्रथा दूर करणे. रोबोटिक सॅनिटेशन मशीनसह “मॅनहोल ते मशीनहोल” योजना
 • सेमी-ऑटोमॅटिक प्रक्रिया प्रकल्प राबवला जाणार
 • राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार

Leave a Comment