CAA News : आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेत सत्ताधारी भाजपने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणेजच CAA लागू केला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.
हे जाणून घ्या कि, या नागरिकांना CAA द्वारे भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिकृत पोर्टलही जारी केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्यासाठी ऑनलाइन पोर्टल जारी केले आहे.
हे लोक भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी https://indiancitizenshiponline.nic.in वर जाऊ शकतात. या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या या तीन देशांतील सहा धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल.
11 डिसेंबर 2019 रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी CAA कायदा मंजूर केला होता आणि एका दिवसानंतर राष्ट्रपतींनी या कायद्याला मान्यता दिली होती. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या लोकांना हा कायदा लागू होईल. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत अर्जदाराला तो भारतात किती दिवस राहतो हे सिद्ध करावे लागेल.
IMD चा ताजा अंदाज! पुढील 4 दिवस ‘या’ भागात कोसळणार धो धो पाऊस; वाचा सविस्तर
अर्ज करणाऱ्यांना नागरिकत्व कायदा 1955 च्या तिसऱ्या अनुसूचीची आवश्यकता देखील पूर्ण करावी लागेल. 2019 मध्ये CAA ला मंजुरी दिल्यानंतर दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. त्याची अंमलबजावणी खूप आधी करता आली असती पण कोरोनामुळे त्याला विलंब झाला.