Electric Scooter: दुचाकी उत्पादक कंपनी Vivolt ने एक नवीन इलेक्ट्रिक कार्गो स्कूटर बाजारात आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही डॅशिंग ई-बाईक 45 किमी प्रतितास टॉप स्पीड देत आहे. तुम्ही एकदा फुल चार्ज केल्यास ही ई-बाईक तुम्हाला 128 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. यात 100W चा बॅटरी पॅक देखील आहे.
वेगवेगळ्या रेंजसह सादर
ही इलेक्ट्रिक स्कूटर जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार, त्याची किंमत एक्स-शोरूम 1.70 लाख रुपयांपासून सुरू होईल. ViVolt स्लाइस लाइट, पाई आणि स्लाइस DLX ट्रिममध्ये ही बाईक ऑफर करण्यात आली होती. जे तुम्हाला वेगवेगळ्या रेंजसह मिळणार आहे.
लगेज बास्केट
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रायडर पेडल असिस्ट मोड, जीपीएस, सिंगल स्पीड ड्राइव्ह ट्रेन देण्यात आली आहे. यामध्ये 500 Wh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे, ती 18 किलो पर्यंत लोड करू शकते. यासोबतच व्हीव्होल्ट स्लाइस डीएलएक्समध्ये सामानाची बास्केटही समोर उपलब्ध आहे. यात एक शक्तिशाली ब्रेकिंग सिस्टम आणि आरामदायी सीट डिझाइन देखील मिळते