Maruti Swift: आज देशातील बाजारपेठेमध्ये मारूती सुझुकीची बोल्ड लूकसह येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट धुमाकूळ घालत आहे. बाजारात या कारची जबरदस्त मागणी पाहायला मिळत आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो या कारमध्ये ग्राहकांना दमदार इंजिनसह उत्तम मायलेज देखील कंपनीकडून देण्यात आले आहे.
यातच जर तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाजारात या कारसाठी 6 ते 10 लाख रूपये मोजावे लागणार आहेत. मात्र तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही मारुती सुझुकी स्विफ्ट सेकंड हॅन्ड देखील खरेदी करू शकता.
CarWale या ऑनलाइन वेबसाईटवर जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या दमदार ऑफर्सबद्दल संपूर्ण माहिती.
Maruti Suzuki Offers
मारुती स्विफ्टचे 2010 मॉडेल या वेबसाइटवर फक्त 1.68 लाख रूपांमध्ये उपलब्ध आहे. ही कार आतापर्यंत 62,314 किलोमीटर धावली आहे. हे जाणुन घ्या ही एक पेट्रोल इंजिन कार आहे.
CarWale वेबसाइटवर दुसऱ्या ऑफरमध्ये मारुती स्विफ्टचे 2010 मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारने आतापर्यंत 95,031 किलोमीटर अंतर कापले आहे.ही पेट्रोल इंजिन कार असून तुम्हाला 1.72 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
CarWale वेबसाइटवर मारुती स्विफ्टचे 2011 मॉडेल देखील विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आले आहे. आतापर्यंत या कारने 45,339 किलोमीटर अंतर कापले आहे. ही पेट्रोल इंजिन कार तुम्ही 1.8 लाख रुपयांना खरेदी करू शकता.