Maruti Suzuki Celerio: कमी किमतीमध्ये जर तुम्ही तुमच्यासाठी हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये एक लोकप्रिय हॅचबॅक कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
होय, भारतीय बाजारात कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि दमदार मायलेजसह येणारी मारुती सुझुकीची लोकप्रिय कार Maruti Suzuki Celerio तुम्ही आता अवघ्या 50 हजारात घरी आणू शकता. या कारमध्ये तुम्हाला जास्त केबिन आणि बूट स्पेस तसेच पॉवरफुल इंजिन पाहायला मिळते. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात ही कार कशी घरी आणू शकता.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या की बाजारात कंपनीने या कारच्या LXI व्हेरियंटची किंमत 5,36,500 एक्स शोरुम ठेवली आहे तर ही कार ऑन रोडवर 5,91,126 रुपये पर्यंत जाते.
मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आता ही कार एका जबरदस्त फायनान्स प्लॅन सह स्वस्तात घरी आणू शकतात.
Maruti Suzuki Celerio LXI फायनान्स प्लॅन
Maruti Suzuki Celerio LXI खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरचा विचार केला तर तुम्हाला बँकेकडून 9.8 टक्के वार्षिक व्याजदराने 5,41,126 रुपये कर्ज मिळू शकते.
हे कर्ज 5 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे आणि त्याची 11,444 रुपये मासिक ईएमआय भरून परतफेड करावी लागेल. कर्ज मिळाल्यानंतर तुम्ही ही स्कूटर 50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह ही कार घरी आणू घेऊ शकता.
Maruti Suzuki Celerio LXI इंजिन आणि पॉवरट्रेन
Maruti Suzuki Celerio LXI मध्ये तुम्हाला 3 सिलेंडर 998cc इंजिन मिळते. ज्यामध्ये 5500 rpm वर 65.7 bhp ची कमाल पॉवर आणि 3500 rpm वर 89 Nm चे पीक टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे.
यामध्ये कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा वापर केला आहे. जे त्याला उत्तम परफॉर्मन्स देते. याच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर कंपनी 25.24 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.