iPhone 14 Pro : जर कमी किमतीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी जबरदस्त फीचर्ससह येणारा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका दमदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.
ज्याच्या मदतीने तुम्हीही कमी किमतीमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या सध्या Amazon प्रीमियम स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर्स देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही iPhone 14 Pro, Xiaomi 13 Pro आणि Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करु शकता.
या स्मार्टफोन्सवर 8 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही हे स्मार्टफोन EMI वर देखील खरेदी करू शकता.
iPhone 14 Pro
iPhone 14 Pro च्या 128GB व्हेरिएंटची बाजारात किंमत 1,29,900 रुपये आहे. मात्र, डील अंतर्गत, 8 टक्के सूट दिली जात आहे, त्यानंतर तुम्ही ते 1,19,900 रुपयांना खरेदी करू शकाल. कंपनी या फोनवर 250 रुपयांची बँक डिस्काउंटही देत आहे. तुम्ही हा फोन आकर्षक EMI वर देखील खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, 37,500 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत.
या फोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. डायनॅमिक आयलंड फीचर्सने सुसज्ज असलेल्या या फोनचा मेन कॅमेरा 48MP आहे. फोनची बॅटरी देखील शक्तिशाली आहे आणि ती एका पूर्ण चार्जवर 23 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देते.
Samsung Galaxy S22 Ultra 5G
सॅमसंगचा हा 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट Rs 1,31,999 च्या किमतीत उपलब्ध आहे. डील अंतर्गत, 22 टक्के सूट दिली जात आहे, त्यानंतर तुम्ही 1,02,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी फोनवर 1750 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटही देत आहे.
एक्सचेंज ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी 37,500 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. या फोनमध्ये कंपनी 120Hz च्या रिफ्रेश रेटसह डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले सारखी फीचर्स देते.
Xiaomi 13 Pro
Xiaomi 13 Pro चा 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 89,999 रुपयांना उपलब्ध आहे. तथापि, यावर 11 टक्के सूट दिली जात आहे, त्यानंतर तुम्ही ते 79,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनवर 37,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.
बँक ऑफरसह, तुम्ही या फोनची किंमत 8,000 रुपयांनी कमी करू शकता. यामध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी तीन 50MP कॅमेरे मिळतील. याशिवाय कंपनी या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 120W चार्जिंग देत आहे.