मुंबई : तेल कंपन्यांनी आज म्हणजेच सोमवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. सलग २६ व्या दिवशी किमती स्थिर आहेत. आजही पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आहे. तर, महाराष्ट्रातील परभणीमध्ये देशातील सर्वात खर्चिक पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशामध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.
1 एप्रिल रोजी केंद्र सरकारचा कर आणि दिल्ली सरकारचा कर (Tax) पेट्रोलच्या किरकोळ किमतीच्या 44 टक्के इतका होता. हे प्रमाण राज्यानुसार बदलते. मुंबईमध्ये 1 एप्रिल रोजी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 116.72 रुपये होती, जी दिल्लीपेक्षा सुमारे 15 रुपये अधिक होती. महाराष्ट्र सरकार प्रत्येक लिटर पेट्रोलसाठी 26 टक्के मूल्यवर्धित करासह (VAT) 10.12 रुपये अतिरिक्त आकारते. त्यामुळे मुंबईतील एकूण कर प्रतिलिटर 50 रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्य सरकारे स्वतंत्रपणे कर आकारतात आणि हा कर लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये सर्वात कमी आहे, जेथे तो अनुक्रमे 0 टक्के आणि 1 टक्के आहे.
उन्हाळ्यात पुणेकरांना जोरदार झटका..! पेट्रोल डिझेल नाही तर ‘या’ इंधनाचे वाढले भाव.. जाणून घ्या..