मुंबई : देशातील आघाडीची डीटीएच कंपनी टाटा स्काय असे नाव आता पाहायला मिळणार नाही. कारण, 27 जानेवारी रोजी त्याचे नवीन नाव टाटा प्ले असे असणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांचा व्यवसाय आता डायरेक्ट टू होम (DTH) पुरता मर्यादित राहिलेला नाही आणि त्यापलीकडे त्याचा विस्तार झाला आहे. त्यामुळे नव्या परिस्थितीनुसार कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा प्ले लिमिटेडचे एमडी आणि सीईओ हरित नागपाल म्हणाले की कंपनीने आता ओटीटी आणि ब्रॉडबँड व्यवसायातही प्रवेश केला आहे. त्यामुळे हे नामांतर केले आहे.
गेल्या काही वर्षांत टाटा स्कायने डीटीएच क्षेत्रात आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. त्यांचा ब्रॉडबँड व्यवसाय देखील वेगाने वाढत आहे आणि आम्ही त्याला टाटा प्ले फायबर असे नाव दिले आहे. त्याचप्रमाणे, Tata Play Binge वर 13 प्रमुख OTT अॅप्स समाविष्ट आहेत. कंपनीची नवीन ब्रँड ओळख लंडनस्थित वेंचरथ्रीने तयार केली आहे आणि त्याची मोहीम ओगिल्वी इंडियाने तयार केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की येत्या काही महिन्यांत त्याची जोरदार जाहिरात केली जाईल. राष्ट्रीय बाजारपेठेतील जाहिरातीसाठी, कंपनीने करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांना साईन केले आहे. तर, आर माधवन आणि प्रियामणी हे दक्षिण भारतीय राज्यांमध्ये याचे प्रमोशन करतील. कंपनीने आपल्या अॅड-ऑन बंडल सेवेमध्ये नेटफ्लिक्सलादेखील जोडले आहे. टीव्ही चॅनेल आणि लोकप्रिय OTT अॅप्ससाठी कॉम्बो ऑफर देखील जाहीर केली. सर्विस विजिटसाठी कंपनी कोणतेही शुल्क आकारणार नाही. निष्क्रिय डीटीएच ग्राहकाने प्लॅटफॉर्मवर रिचार्ज केले आणि पुन्हा कनेक्ट केले, तर त्याच्याकडून पुन्हा कनेक्शन शुल्क आकारले जाणार नाही.
अर्र.. अवघडच की.. भारत-पाकिस्तान एकाच यादीत..! अमेरिकेच्या प्रशासनाने नेमके काय म्हटलेय पहा https://t.co/hr3p3856MK
— Krushirang (@krushirang) January 26, 2022