New Delhi : एडटेक बायजूस (Ed-tech Byju’s Company) कंपनीने मार्च २०२३ पर्यंत मार्केटिंग आणि ऑपरेशनल कॉस्ट ऑप्टिमाइझ (Marketing and operational cost Optimize) करण्याची फायदेशीर योजना बनवली आहे. कंपनीचे खर्च कमी करून फायदेशीर स्थितीत पोहोचण्याची ही योजना आहे. यासाठी कंपनी पुढील सहा महिन्यांत पाच टक्के किंवा सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.
कंपनीच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ (CEO Divya Gokulnath) यांनी पीटीआय (PTI News Agency) या वृत्तसंस्थेला सांगितले की, कंपनी नवीन भागीदारीद्वारे परदेशात ब्रँड जागरूकता करण्यावर आणि ते वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार असून यासाठी ते भारत आणि परदेशातील (Indian and Foreign Business) व्यवसायासाठी १०,००० शिक्षकांची नियुक्ती देखील करणार आहे.”आम्ही मार्च २०२३ पर्यंत नफा मिळवण्याच्या स्थितीचा मार्ग तयार केला आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये लक्षणीय ब्रँड जागरूकता निर्माण केली आहे.
- Technology : चीनला मोठा झटका..! जगातील ‘या’ दिग्गज कंपनीबाबत भारताबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- Maharashtra Politics : ‘त्या’ मुद्द्यावर काँग्रेसचे शिंदे सरकारला पत्र; पहा, काय केली सरकारकडे मागणी
- Agriculture News: Ahmednagar: दिवाळीत फुलांची सजावट ठरू शकते महाग; पावसामुळे उत्पादनात मोठी घट
- Pune Education: आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; पाहा कोणाच्या कामाचे होणार कौतुक
मार्केटिंग बजेट (Marketing budget) थोडंफार कमी करण्याच्या योजनेअंतर्गत आणि खर्चाला प्राधान्य देणार आहे. ज्यामुळे जागतिक पाऊलखुणा निर्माण होऊन एकाधिक व्यवसाय युनिट्सचे एकत्रीकरण होण्यास मदत होईल,” असं गोकुळनाथ म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, के१० (K10) च्या ज्या उपकंपन्या मेरिटनेशन (Merit nation), ट्युटरविस्टा (Tutor Vista), स्कॉलर आणि हॅशलर्न (Scholar and Hash Learn) आता भारतीय व्यवसायांतर्गत एक व्यवसाय युनिट म्हणून एकत्रित केल्या जातील.
या नवीन योजनेमुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे हायब्रीड लर्निंग मॉडेल म्हणजे ‘ट्यूशन सेंटर’ (Tuition Center) आणि आमचे ‘ऑनलाइन लर्निंग मॉडेल’ (Online learning Model) जे बायजूचे क्लासेस किंवा आमचे ‘लर्निंग अँप’ (Learning app) आहे. यासाठी आम्ही १०,००० शिक्षकांची नियुक्ती करण्याचे नियोजन केले आहे.