Business News : भारताने (India) संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सोबतच्या बैठकीत कृषी क्षेत्र (agricultural Sector) आणि तांदूळ निर्यातदारांच्या (Rice Export) समस्या ठळकपणे मांडल्या. भारत-यूएई कौन्सिलचे (India-UAE Council) अध्यक्ष, संसद सदस्य आणि भारत यूएई जॉइंट टास्क फोर्स (India UAE Joint Task Force) एस. विक्रमजीत सिंग (S. Vikramjit Singh) यांनी यूएईचे (UAE) विदेश व्यापार राज्यमंत्री (Minister of State for Foreign Trade) डॉ. थानी बिन अहमद अल जेयुदी (Dr. Thani Bin Ahmed Al Jeyudi) यांच्या भेटी दरम्यान द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
- Business News : “या” व्यवसायात भारत करेल १० वर्षात दुप्पट उत्पादन : पंतप्रधान मोदींना आहे विश्वास
- मुंबई : म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक नोव्हेंबरमध्ये भेटणार
- Opening Bell : निफ्टी १७,८०० तर सेन्सेक्स ६०,००० च्या वर
- Recession in America : म्हणून आला हिरव्या रंगात अमेरिकन जीडीपी
सिंग म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये झालेल्या दोन प्रमुख करारांमुळे द्विपक्षीय व्यापार नवीन उंची गाठत आहे. दोन्ही देशांमधील चर्चा सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार (CEPA) आणि मुक्त व्यापार करार (FTA) च्या निष्कर्षांनुसार होती.
सिंह यांनी भारतीय निर्यातदारांनी तांदूळ नाकारल्याचा प्रश्न उपस्थित केला. ज्यामध्ये कीटकनाशके (pesticides), त्यांनी लॅबची स्थापना (Establishment of Lab), भारतातील फार्मा उत्पादनांची (pharma products) जलद स्वीकृती (speedy adoption) आणि दोन्ही देशांना स्वीकारार्ह मानके यावर भर दिला. युएईमध्ये गुंतवणुकीची किमान मर्यादा कमी करण्यावरही त्यांनी भर दिला. सध्या ते १० कोटी दिरहम आहे.
भारत-यूएई द्विपक्षीय गुंतवणुकीवर (Investment) लवकर निर्णय घेण्यावर, दोन्ही देशांमधील संयुक्त उपक्रमांवरील काम सुव्यवस्थित करण्यावरही त्यांनी भर दिला. यूएईच्या मंत्र्यांनी भारतासोबतच्या व्यापार स्थितीवर समाधान व्यक्त केले. तसेच भारतात गुंतवणुकीचे आश्वासन दिले.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून एस. विक्रमजीत सिंग यांनी राज्य आणि यूएई यांच्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंजाबमधील पायाभूत सुविधा (Investment in infrastructure), बासमती निर्यात (basmati export), कृषी प्रक्रिया क्षेत्रातील (Agro processing sector) गुंतवणूक यावर त्यांनी चर्चा केली.