Business News : मुंबई (Mumbai) : गेल्या आठ वर्षांतील सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारत (India) हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा (Second in the world) पोलाद उद्योग (Steel industry) बनला आहे. त्यात अजूनही विस्ताराची मोठी क्षमता आहे. स्वदेशी क्षमता वाढविण्यासाठी पुढील ९-१० वर्षांमध्ये क्रूड स्टील उत्पादन (Crude steel production) क्षमता दुप्पट करून ३०० दशलक्ष टन प्रतिवर्ष केली जाईल. सध्या १५४ दशलक्ष टन क्रूड स्टीलचे वार्षिक उत्पादन (Annual income) होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra modi) यांनी शुक्रवारी सांगितले.
गुजरातमधील आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडियाच्या (Arcelor Mittal Nippon Steel India) फ्लॅगशिप प्लांटच्या (Flagship plant) विस्ताराच्या भूमिपूजन समारंभात (ceremony) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (Video Conference) संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की उत्पादनावर आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेमुळे उद्योगाचा विस्तार होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे आत्मनिर्भर भारत (Self-reliant India) उपक्रमाला बळ दिले.
- Metaverse : “मेटावर्स’मध्ये प्रवेश करणारी ‘ही’ पहिली भारतीय कंपनी
- Auto Sector Q2 result : “या” कंपनीचा नफा चार पटीने वाढून रु. २०६१.५ कोटी झाला
- Recession in America : म्हणून आला हिरव्या रंगात अमेरिकन जीडीपी
- Opening Bell : निफ्टी १७,८०० तर सेन्सेक्स ६०,००० च्या वर
आम्ही उच्च दर्जाच्या स्टीलची (High quality steel) उत्पादन क्षमता वाढवू शकलो आणि त्याची आयात कमी करू शकलो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठा स्टील उत्पादक बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या क्षेत्राची झपाट्याने वाढ करण्यासाठी आवश्यक धोरणे आणि पोषक वातावरण (Policies and Nurturing Environment) निर्माण करण्यासाठी सरकार काम करत आहे. हा प्लांट सुरत (Surat) जिल्ह्यातील हजीरा (Hazira) येथे आहे.
आयएनएस विक्रांत हे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज
मोदी म्हणाले, संरक्षण क्षेत्रासाठी भारताला नेहमी उच्च दर्जाचे स्टील आयात करावे लागले पण आता परिस्थिती बदलली आहे. देशांतर्गत उद्योगाच्या कार्यक्षमतेमुळे आयएनएस (INS Vikrant) विक्रांत ही स्वदेशी क्षमता (Indigenous capacity) आणि तंत्रज्ञानाने (Technolgy) बांधलेली पहिली स्वदेशी विमानवाहू जहाज (aircraft carrier) बनली. विमानवाहू जहाजांच्या निर्मितीसाठी भारताचे इतर देशांवर अवलंबून राहणे योग्य नाही. डीआरडीओच्या (DRDO) शास्त्रज्ञांनी (Scientists) विमानवाहू जहाजांमध्ये वापरण्यासाठी विशेष स्टील विकसित केले आहे.
हजीरा प्लांटच्या (Hazira Plant) विस्तारासाठी ६०००० कोटींहून अधिक गुंतवणूक (Investment) होणार असल्याचे पंतप्रधानानी सांगितले. यामुळे गुजरात आणि देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या विस्तारानंतर, हजीरा प्लांटमधील कच्च्या स्टीलची (Raw steel) उत्पादन क्षमता ९ दशलक्ष टनांवरून वार्षिक १५ दशलक्ष टनांपर्यंत वाढेल.