Business Idea : सध्या नोकरी मिळणे आणि ती टिकवणे अवघड झाले आहे. कारण सध्या अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. पण तुम्ही आता तुमचा व्यवसाय सुरु करून चांगली कमाई करू शकता.
प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात पीठ वापरले जाते. सामान्य पिठासोबत मल्टीग्रेन पीठ बनवण्याचा ट्रेंड असून तुम्ही आता ज्वारी, मका, गहू, बाजरी, नाचणी, हरभरा, कडधान्ये इत्यादी धान्य गिरणीत योग्य प्रमाणात दळून पीठ तयार करून विकू शकता.
असा सुरू करा व्यवसाय
तुम्ही पीठ गिरणीचा व्यवसाय लहान किंवा मोठ्या प्रमाणावर सुरू करू शकता. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे असल्यास तुम्ही धान्य दळण्यासाठी आणि पीठ पॅक करण्यासाठी मोठी मशीन खरेदी करू शकता. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही सामान्य पिठाची गिरणी खरेदी करून हा व्यवसाय छोट्या ठिकाणी सुरू करू शकता. यात तुम्हाला फक्त बाजारातून मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी करावे करून ते दळून विकावे लागेल.
लोकांचा सेंद्रिय पिठाकडे कल वाढला असून आता नवनवीन प्रयोग करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करू शकता, त्यापासून पीठ तयार करून सामान्यपेक्षा जास्त किमतीत विकू शकता. खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून शहरी भागातही लोक आता थेट गिरणीतून पीठ खरेदी करण्यावर अवलंबून आहेत.
होईल दुप्पट कमाई
बेसिक पिठाच्या बरोबरच तुम्हाला पिठाच्या गिरणीत अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतील. तुम्ही हंगामानुसार मका, बाजरी, नाचणी इत्यादींचे पीठ तयार करून त्याची विक्री करू शकता. यासह, आपण एक लहान मशीन बसवून मसाले दळण्याचे काम चालू करू शकता. हे लक्षात घ्या की यामध्ये तुम्हाला जास्त भांडवल गुंतवावे लागणार नाही परंतु तुमचे उत्पन्न दुप्पट होते. पिठाच्या गिरणीच्या व्यवसायातून तुम्ही दरमहा 30 ते 40 हजार रुपये सहज मिळवू शकता.