Business Idea on Rooftop : तुमच्या घराचं छतही देईल बक्कळ पैसा; ‘या’ 3 पैकी कोणताही बिजनेस सुरू करा

Business Idea on Rooftop : आजच्या काळात फक्त नोकरी करून भागत नाही. उत्पन्नाचा पर्यायी (Business Idea on Rooftop) मार्ग तयार असणे ही काळाची गरज आहे. कोरोनाच्या संकटात (Corona Virus) या गोष्टीची जाणीव अनेकांना झाली. या काळात अनेकांचे रोजगार बुडाले, कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. यातील बहुतांश लोकांकडे उत्पन्नाचा पर्यायी मार्ग नव्हता. त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. आता मात्र परस्थिती तशी राहिलेली नाही. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली आहे. रोजगारनिर्मितीही वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत पैसे मिळवण्याचे पर्यायी मार्ग शोधायला हवेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मार्गांची माहिती (Business Idea) देणार आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

टेरेस फार्मिंग 

या कामासाठी तुम्हाला जागा शोधण्याचीही गरज नाही. तुम्ही तुमच्या घराच्या छताचाही (Rooftop Farming) यासाठी वापर करू शकता. घराच्या छतावर तुम्हा छोटीशी शेती करू शकता. येथील पिके तुम्ही चांगल्या किंमतीत विकू शकता. टेरेस जितके मोठे असेल तितकी जागा जास्त मिळेल. जास्त पिके घेता येतील. बिहार सरकार टेरेस फार्मिंगसाठी 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 50 टक्के अनुदानही देते. छतावरील शेतीत तु्म्ही टोमॅटो, गाजर, संत्री, मिरची आणि काही हिरव्या भाज्या घेऊ शकता.

Business Idea on Rooftop

Business Idea : घरबसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय, काही दिवसातच होईल लाखात कमाई

Business Idea on Rooftop

सोलर पॅनेल

तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावून (Solar Panel) त्याद्वारे पैसे कमावू शकता. याद्वारे तुम्हाला दोन प्रकारचे फायदे मिळतात. या पॅनलद्वारे तयार झालेली वीज तुम्ही वापरू शकता. तसेच शिल्लक राहिलेली वीज विकू शकता. तुमच्या घरातील विजेचे बील एक हजार रुपये येत असेल तर तुम्ही 1 किलोवॅटपर्यंत ऊर्जा निर्माण करून हे बील शून्यावर आणू शकता. अतिरिक्त वीज विक्री करून प्रति युनिट 5 ते 6 रुपये कमावू शकता.

Business Idea on Rooftop

मोबाइल टॉवर

मोबाइल टॉवर बसवण्यासाठी मोकळ्या (Mobile Tower) छताची गरज असते. जर तुमच्या घराचे छत मोकळे असेल तर मोबाइल कंपन्यांना टॉवरसाठी तुम्ही छत भाडोत्री देऊ शकता. याद्वारे दर महिन्याला तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. लहान शहरांमध्ये दर महिन्याला 60 हजार रुपये इतके उत्पन्न याद्वारे मिळू शकते.

Business Idea : नोकरीचे मिटले टेन्शन! सुरु करा वर्षभर मागणी असणारा व्यवसाय, होईल दरमहा 30 ते 40 हजारांची कमाई

Business Idea on Rooftop

Leave a Comment