अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात अनेकांनी स्वतःचा काहीतरी बिजनेस सुरू करण्याचा विचार केला, अनेकांनी तर हा विचार प्रत्यक्षात आणून बिजनेस सुरू देखील केला. आजही अनेक जण नवीन बिजनेस सुरू करण्याचा विचार करत आहेत. असे बरेचसे व्यवसाय आहेत जे आपण अगदी घरुन सुद्धा करू शकतो. तसेच नोकरदार मंडळींना त्यांचा रोजगार सांभाळूनही व्यवसाय करता येणे शक्य होते. पापड तयार करण्याचा व्यवसाय हा असाच एक व्यवसाय आहे, जो तुम्ही तुमच्या घरून सुरू करू शकता. ते ही अगदी कमी पैशात. जर पापडाची चव जर अनोखी आणि खास असेल तर तुम्ही पापड व्यवसायातही मोठा नफा कमवू शकता.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामध्ये मुद्रा योजनेंतर्गत 4 लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. अहवालानुसार, एकूण 6 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. त्यानंतर सुमारे 30 हजार किलो पर्यंत पापड तयार करणे शक्य होईल. या बिजनेससाठी साधारण 250 चौरस मीटर जमीन लागणार आहे.
या खर्चामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल दोन्ही समाविष्ट आहे. अहवालानुसार, स्थिर भांडवलामध्ये 2 मशीन, पॅकेज मशीन उपकरणे आणि खेळत्या भांडवलामध्ये तीन महिन्यांतील कर्मचार्यांचे तीन महिन्यांचे पगार, कच्चा माल आणि उत्पादन खर्च यांचा समावेश होतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, टेलिफोन बिल आदी खर्चाचाही यात समावेश आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 250 चौरस फूट जागा आवश्यक आहे. याशिवाय 3 अकुशल कामगार, 2 कुशल कामगार आणि एका पर्यवेक्षकाची आवश्यकता असेल. हे सुरू करण्यासाठी तुम्हाला 4 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. यानंतर तुम्हाला फक्त 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. कर्ज घेण्यासाठी तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. कर्जाची रक्कम 5 वर्षांपर्यंत परत केली जाऊ शकते.
पापड तयार केल्यानंतर तो घाऊक बाजारात विकावा लागतो. याशिवाय किरकोळ दुकाने, किराणा दुकाने, सुपर मार्केटशी संपर्क साधून विक्री वाढ करता येते. या बिजनेसच्या माध्यमातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
बिजनेस आयडीया : सरकारच्या मदतीने सुरू करा ‘हा’ बिजनेस; मिळेल चांगले उत्पन्न; जाणून घ्या, डिटेल